एक्स्प्लोर

Nashik TCS Case: 'गुगल सर्च'मुळे झाला मोठा भांडाफोड; नाशिक TCS प्रकरणात एसआयटीने सादर केला हादरवणारा पुरावा, कोर्टात नेमकं काय घडलं?

Nashik TCS Case: नाशिक येथील टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. विशेष तपास पथकाने न्यायालयात एक हादरवणारा पुरावा सादर केला आहे.

Nashik TCS Case: नाशिक येथील टीसीएस (Nashik TCS Case) कंपनीतील अविवाहित तरुणीवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) न्यायालयात एक हादरवणारा पुरावा सादर केला आहे. संशयितांनी पीडितेचे सक्तीने धर्मांतर करून तिचे नाव 'हानिया' ठेवण्यासाठी तब्बल एक वर्षापूर्वी, म्हणजेच 5 एप्रिल 2025 रोजी इंटरनेटवर नावाचा शोध घेतल्याची माहिती समोर येत आहे.  

Nashik TCS Case: शैक्षणिक कागदपत्रे जप्त करून भरली 'जकात'

संशयितांनी केवळ गुगल सर्च केला नाही, तर पीडितेची सर्व शैक्षणिक कागदपत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली. त्यानंतर तिचे बेकायदेशीरपणे नामांतर करून, तिच्या या बदललेल्या नवीन नावाने नऊ हजार रुपयांची 'जकात' देखील भरल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. एसआयटीने या सर्व बाबींचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत.

Nashik TCS Case: एमआयएम नगरसेवक आणि मालेगावच्या 'इस्लाम पार्टी'चे कनेक्शन

या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात (Deolali Camp Police Station) पीडितेच्या फिर्यादीवरून मुख्य संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मात्र, एसआयटीच्या सखोल तपासात छत्रपती संभाजीनगरमधील 'एमआयएम'चा (MIM) नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक हानिफ शेख यांना सहसंशयित करण्यात आले आहे. मतीन पटेलने संशयित निदा खानला लपण्यासाठी हानिफचे घर उपलब्ध करून दिले होते. विशेष म्हणजे, मालेगावच्या 'इस्लाम पार्टी'चे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार आशिफ शेख यांनी मुख्य संशयित दानिश शेख याला वकील आणि कायदेशीर मदत पुरवत जाहीर पाठिंबा दिला आहे.

Nashik TCS Case: निदा खान गर्भवती; न्यायालयाकडून वैद्यकीय तपासणीचे आदेश

नाशिकरोड न्यायालयात 22 जून रोजी झालेल्या खटल्याच्या दुसऱ्या सुनावणीदरम्यान, संशयित निदा खानच्या वकिलांनी तिच्या वैद्यकीय तपासणीचा अर्ज सादर केला. निदा खान (Nida Khan) सध्या गर्भवती असून तिच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले आहे, तसेच तिला कारागृहात जड कामे करावी लागत असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला. यापूर्वी तिचा एकदा गर्भपात झाला असल्याने तिला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे वकिलांनी सांगितले. न्यायालयाने हा अर्ज मंजूर करत कारागृह प्रशासनाला निदाच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले आहेत.

Nashik TCS Case: जामिनावर उद्या अंतिम निर्णय

सध्या मुख्य संशयित निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार हे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर 19 जून रोजी सरकारी आणि विरोधी पक्षातर्फे तब्बल तीन तास जोरदार युक्तिवाद झाला होता. या प्रकरणात एसआयटीने तब्बल 1500 पानांचे दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल केले आहे. 25 जून रोजी यावर अंतिम आदेश होणार होता, मात्र न्यायालयाच्या व्यस्ततेमुळे तो लांबणीवर पडला. आता मंगळवारी (30 जून) न्यायालय संशयितांना जामीन देणार की त्यांचा अर्ज फेटाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Nashik TCS Case: नाशिक TCS प्रकरणात MIM नंतर मालेगावच्या 'इस्लाम पार्टी'ची एन्ट्री, न्यायालयात वकील दिला; आसिफ शेख म्हणाले, 'ही लढाई सुप्रीम कोर्टात गेली तरी...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
Nashik Crime News: 10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा, नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नोटा छापण्याची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले
10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा, नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नोटा छापण्याची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
Embed widget