एक्स्प्लोर

Nashik TCS Case Nida Khan Arrested: टीसीएस धर्मांतर प्रकरणाची सूत्रधार निदा खानला लपवून ठेवणारा एमआयएमचा 'तो' नगरसेवक कोण?

Nashik TCS Case Nida Khan Arrested: नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या अटकेनंतर आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Nashik TCS Case Nida Khan Arrested: नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान (Nida Khan) हिच्या अटकेनंतर आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 40 दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये लपवून ठेवण्यासाठी एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल (Matin Patel) यांनी मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांना नोटीस बजावली असून त्यांचा मोबाईलही जप्त केला आहे.

Nashik TCS Case Nida Khan Arrested: नगरसेवकाचा 'तो' फ्लॅट अन् निदाचा मुक्काम

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान गेल्या 5 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये होती. ती नगरसेवक मतीन पटेल यांच्या संपर्कात आल्यानंतर निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये आली. मतीन पटेल यांनी दोन महिन्यांपूर्वी नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात एक नवीन घर (फ्लॅट) विकत घेतले होते. याच घरात निदा खानला ठेवण्यात आले होते.  

Nashik TCS Case Nida Khan Arrested: असा लागला छडा

निदा खान कौसर पार्क येथील मतीन पटेल यांच्या मालकीच्या घरात लपली असल्याची कुणकुण नाशिक पोलिसांना लागली. नाशिक पोलिसांनी तातडीने ही माहिती संभाजीनगर पोलिसांना कळवली. त्यानंतर नाशिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने सलग दोन दिवस या इमारतीवर पाळत ठेवली. तांत्रिक तपासात खात्री पटताच मध्यरात्री छापा टाकून निदा खानला ताब्यात घेण्यात आले.

Nashik TCS Case Nida Khan Arrested: आंतरराष्ट्रीय सिंडिकेट आणि तपासाचा वेग

निदा खानने अटकेपासून वाचण्यासाठी गरोदर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले होते, मात्र न्यायालयाने हे प्रकरण 'आंतरराष्ट्रीय सिंडिकेट'शी संबंधित असल्याचे सांगत तिचा जामीन फेटाळला. निदाच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, परकीय निधी (Funding) आणि धर्मांतराचे जाळे यावर प्रकाश पडण्याची शक्यता आहे.

Nashik TCS Case Nida Khan Arrested: दोन आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर करणार 

दरम्यान, नाशिकमधील TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांना पुढील गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयीन कोठडीतून पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई नाका पोलिसांकडून दोघांची चौकशी सुरू असून, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पीडितेच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही दोघांवर आहे. तसेच फिर्यादीला दिलेल्या गुंगीकारक पदार्थाचा स्रोत, बँक व्यवहार आणि फंडिंग याबाबतही पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.

Gopichand Padalkar: निदा खान संभाजीनगरमध्ये सापडणे म्हणजे मोठे षडयंत्र : गोपीचंद पडळकर

या प्रकरणावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, सातत्याने जिहादी प्रवृत्ती डोक वर काढत आहेत. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण पोलिसांनी अत्यंत लक्षपूर्वक व काळजीपूर्वक बाहेर काढले. या प्रकरणातील मास्टरमाईंड निदा खान हिला संभाजीनगरमधून अटक केली आहे. इम्तियाज जलील यांनी याच निदा खानचे समर्थन केले होते. निदा खान संभाजीनगरमध्येच सापडली, एमआयएमच्या नगरसेवकाचे तिला पाठबळ आहे. या सर्व प्रकरणात इम्तियाज जलील यांचा मुख्य रोल आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याचा तपास करावा. भोंदू खरात प्रकरणात हिंदू समाजाने त्याला जेलमध्ये टाकण्यापासून रोखले नाही. दुसरीकडे निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील व त्यांचे सहकारी तात्काळ उघडपणे भूमिका घेत आहेत. निदा खान संभाजीनगरमध्ये सापडणे म्हणजे यामध्ये मोठे षडयंत्र आहे.  म्हणूनच इम्तियाज जलील व त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करून त्यांना या गुन्ह्यात आरोपी करावे, अशी मागणी त्यांनी केली.  

Nitesh Rane: एमआयएम हा अतिरेकी पक्ष : नितेश राणे

नितेश राणे यांनी या प्रकरणावर म्हटले आहे की, 2047 पर्यंत या राज्याला गजवा-ए-हिंदच्या अंतर्गत इस्लाम राष्ट्र बनवणे हे या लोकांचे मनसुबे आहेत. एमआयएम हा अतिरेकी पक्ष आहे. या पक्षात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मागची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. इम्तियाज जलील हे निदा खानची बाजू घेत होते. इम्तियाज जलील यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

Nida Khan: निदा खान प्रकरणात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

निदा खान प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बलात्कार, धर्मांतर आणि ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात सहआरोपी असलेल्या निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप करत पोलिसांनी संभाजीनगरमधील मतीन पटेल यांना सहआरोपी केले आहे. या प्रकरणी मतीन पटेल यांच्या विरोधात नाशिकमध्ये बीएनएस कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Who is Matin Patel: कोण आहे मतीन पटेल? 

मतीन पटेल हे संभाजीनगरमधील प्लॉटिंग व्यवसायिक असून गेल्या दहा ते बारा वर्षांपासून एमआयएम पक्षात सक्रिय आहे. ते इम्तियाज जलील यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातात. महापालिका निवडणुकीत एमआयएमने प्रभाग क्रमांक 9 मधून मतीन पटेल आणि त्याच्या बहिणीला उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत मतीन पटेल यांनी कलीम कुरेशी यांचा पराभव करून विजय मिळवला होता. त्यानंतर मतीन आणि त्यांची बहीण दोघेही नगरसेवक म्हणून निवडून आले. दरम्यान, निवडणुकीपूर्वी मतीन पटेल यांचा एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते चर्चेत आले होते. तसेच मनपा निवडणुकीदरम्यानही त्यांच्यावर विविध आरोप करण्यात आले होते.

आणखी वाचा 

Nashik TCS Case Nida Khan Arrested: निदा खानने लपण्यासाठी खास लोकेशन निवडलं; आजूबाजूला एकही घर नाही, लांबलांबपर्यंत सापडण्याची शक्यताच नव्हती, मात्र पोलिसांनी कसं हुडकून काढलं?

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Crime News : आधी बँकेच्या बाहेर पत्नीला गोळ्या घातल्या, मग बहिणीला मारलं, शेवटी स्वतःचं जीवनही संपवलं; कौटुंबिक वादातून 3 जणांचा अंत
आधी बँकेच्या बाहेर पत्नीला गोळ्या घातल्या, मग बहिणीला मारलं, शेवटी स्वतःचं जीवनही संपवलं; कौटुंबिक वादातून 3 जणांचा अंत

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
Embed widget