Nashik TCS Case Nida Khan Arrested: निदा खानने लपण्यासाठी खास लोकेशन निवडलं; आजूबाजूला एकही घर नाही, लांबलांबपर्यंत सापडण्याची शक्यताच नव्हती, मात्र पोलिसांनी कसं हुडकून काढलं?
Nashik TCS Case Nida Khan Arrested: नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान हिला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे.

Nashik TCS Case Nida Khan Arrested: नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि कंपनीची माजी एचआर (HR) निदा खान (Nida Khan) हिला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. गेल्या 40 दिवसांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देणारी निदा खान अखेर छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) एका अशा ठिकाणी लपली होती, जिथे पोहोचणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते.
Nashik TCS Case Nida Khan Arrested: लपण्यासाठी निवडलं खास लोकेशन
निदा खानने अटकेपासून वाचण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कौसर कॉलनी निवडली होती. हे लोकेशन इतकं खास होतं की, ज्या इमारतीत ती लपली होती, तिच्या आजूबाजूला लांबलांबपर्यंत एकही घर नव्हतं. वर्दळ नसलेला आणि निर्जन भाग असल्याने कोणाला संशय येण्याची शक्यताच नव्हती. निदाला वाटले होते की या एकाकी भागात ती पोलिसांच्या नजरेतून सुरक्षित राहील, मात्र पोलिसांनी तिचा हा भ्रम तोडला.
Nashik TCS Case Nida Khan Arrested: दोन दिवस पोलिसांचा 'वॉच' अन् छापा!
निदा खान आपल्या कुटुंबासह (आई, वडील, भाऊ आणि आत्या) नारेगावच्या एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास होती. नाशिक एसआयटीला (SIT) तांत्रिक तपासाद्वारे ती संभाजीनगरमध्ये असल्याची खात्री पटली होती. पोलिसांनी सलग दोन दिवस त्या इमारतीवर लांबून नजर ठेवली. जेव्हा ती फ्लॅटमध्येच असल्याची खात्री पटली, तेव्हा नाशिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री छापा टाकून तिला बेड्या ठोकल्या.
Nashik TCS Case Nida Khan Arrested: जामीन फेटाळला अन् 'गेम' उलटला
निदा खानने स्वतःला गरोदर असल्याचे सांगत आणि वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, नाशिक जिल्हा न्यायालयाने हे प्रकरण केवळ वैयक्तिक वाद नसून एका 'आंतरराष्ट्रीय सिंडिकेट'चा भाग असल्याचे निरीक्षण नोंदवत तिचा जामीन वारंवार फेटाळला. जामीन फेटाळल्याच्या तीनच दिवसांत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. आता निदा खानच्या अटकेनंतर नाशिक धर्मांतर प्रकरणात आणखी काय धक्कादायक माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Nashik TCS Case: धर्मांतरण प्रकरणात दोन आरोपी आज पुन्हा न्यायालयात
नाशिकमधील TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आरोपी शाहरुख कुरेशी आणि रझा मेमन यांना पुढील गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयीन कोठडीतून पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई नाका पोलिसांकडून दोघांची चौकशी सुरू असून, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पीडितेच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही दोघांवर आहे. तसेच फिर्यादीला दिलेल्या गुंगीकारक पदार्थाचा स्रोत, बँक व्यवहार आणि फंडिंग याबाबतही पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.
आणखी वाचा
Before You Go
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या






















