एक्स्प्लोर

Nashik : पोलिस शिपायाने सहा वर्षांच्या मुलीला गळफास लावला, स्वतःही आत्महत्या केली; नाशिकमध्ये खळबळ

Nashik : या आत्महत्येमागचं नेमका कारण काय याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेने नाशिकच्या पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. 

नाशिक : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून पोलिस शिपायाने स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलीला गळफास लावून संपवलं. त्यानंतरल त्याने स्वतःही गळफास लावून आत्महत्या केली. घटस्फोटानंतर मानसिक तणावानंतर त्याने हे कृत्य केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. स्वप्नील गायकवाड असं त्या पोलिस शिपायाचं नाव असून भैरवी असं सात वर्षांच्या मुलीचं नाव आहे. 

नाशिक शहर पोलिस दलात कार्यरत असलेला पोलीस शिपाई स्वप्निल गायकवाड याचा त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली होता. त्यामुळेच त्याने स्वतःच्या सहा वर्षाच्या मुलीची गळफास देऊन हत्या केली. नंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. 

या घटनेप्रकरणी नासिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी स्वप्नील गायकवाडच्या घटस्फोटीत पत्नीकडून माहिती घेतली जाणार असल्याचं पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलं. या घटनेमागे नेमकं काय कारण आहे याचाही तपास सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली.

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीचं टोकाचं पाऊलं

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे हरियाणा रोहतक येथील एका विवाहीत व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाच्या पत्नीचं पोलीस कर्मचाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. दोघांनी अश्लील कृत्ये आणि डान्स करतानाचा व्हिडीओ तयार केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ पत्नीने तिच्या मृत विवाहित व्यक्तीला पाठवला होता. त्यानंतर, नैराश्यामुळे पतीने 3 दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने एक व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने आरोप केला होता की, त्याची पत्नी दिव्या आणि तिचा बॉयफ्रेंड जो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलात आहे, हे दोघे मिळून त्याला मानसिक त्रास देत होते. पत्नी दिव्या त्याला त्याच्या वडिलांना मारण्यास आणि वडिलोपार्जित जमीन विकण्यास सांगत होती. 

पोलिस बॉयफ्रेंडला बढतीसाठी पैशांची आवश्यकता होती, त्यासाठी ती पतीला ब्लॅकमेल करत होती. व्हिडिओमध्ये या तरुणाने पोलिसांकडे मागणी केली होती की, त्याची पत्नी आणि बॉयफ्रेंडवर कठोर कारवाई करावी. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित पोलीस कर्मचारी दोन दिवसांपूर्वी पंधरा दिवसांची रजा टाकून गायब झाला आहे.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Embed widget