एक्स्प्लोर

Nashik Crime : देवीचा प्रसाद म्हणून गुंगीचं औषध द्यायचे, प्रवाशांसह वाहनचालकांना लुटायचे! नाशिकच्या टोळीला अटक

Nashik Crime : नाशिककर (Nashik) प्रवास करताना सावधान, ही बातमी तुमच्यासाठी असून नाशिक पोलिसांना महत्वाची टोळी हाती लागली आहे.

Nashik Crime : नाशिककर (Nashik) प्रवास करताना सावधान, ही बातमी तुमच्यासाठी आहे. प्रवासात गुंगीचे औषध देऊन लुटणारी टोळीला (Robbery Gang) नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून एक चारचाकी, 13 ग्राम तोळे सोने असा 14 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रवासात गुंगी देणारे औषध देऊन लूटमार करणारी महिला आणि तिच्या चार साथीदारांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. 

एकीकडे आजकाल गुन्हेगारी (Crime) वाढत चालली असून एक ना अनेक प्रकारे लुट केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशातच नाशिक पोलिसांना महत्वाची टोळी हाती लागली आहे. देवीचा प्रसाद म्हणून पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन वाहनासह वाहनमालक अथवा चालकाला लुटणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. या टोळीतील प्रमुख संशयित महिला काजल उगरेजसह दिनेश कबाडे, निलेश राजगिरे, किरण वाघचौरे आणि मनोज पाटील यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपासात अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. 

दरम्यान नाशिक शहरातील सिडकोतील बापू सूर्यवंशी यांचा वाहन चालविण्याचा व्यवसाय आहे. सूर्यवंशी यांच्याशी पंचवटी येथील काजल उगरेज हिने दूरध्वनीवरून संपर्क साधत सूरत येथे जायचे असल्याचे सांगितले. 12 मे रोजी ठरल्यानुसार उगरेज यांना पंचवटी परिसरातून पुढील प्रवासासाठी सूर्यवंशी यांनी वाहनात बसविले. दिंडोरी रोड परिसरात उगरेज यांचे काही मित्र वाहनात बसले. त्यांनी देवीचा प्रसाद म्हणून गुंगीचे औषध टाकलेला पेढा वाहनचालक सूर्यवंशी यांना खाण्यासाठी दिला. पेढा खाल्ल्यानंतर सूर्यवंशी यांची शुद्ध हरपताच त्यांची स्विफ्ट कार, अंगावरील सोन्याचे दागिने, पाकीट असा एक लाख, 91 रुपये किंमतीचा माल लंपास केला. या प्रकरणी सूर्यवंशी यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

देवीचा प्रसाद पाहून खा..... 

म्हसरूळ पोलीस आणि गुन्हे शाखा विभाग एकच्या वतीने या घटनेचा तपास करण्यात आला. तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे म्हसरूळ परिसरातील गुन्हेगार नीलेश राजगिरे याचा सहभाग असल्याचे लक्षात आले. राजगिरे यास 22 मे रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्हयात सहभाग असणारी काजल आणि मुख्य संशयित दिनेश कबाडे, किरण वाघचौरे, मनोज पाटील यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली. कबाडे याला नाशिकरोड परिसरातून वाहनासह ताब्यात घेण्यात आले. संशयित महिला आणि अन्य संशयितांनाही ताब्यात घेतले. 

टोळीची मुख्य महिला संशयित 

दरम्यान म्हसरूळ हद्दीतील गुन्ह्यातील वाहन, 29 ग्रॅम सोने असा 14 लाख 86 हजार 500 रुपयांचा मुद्देमालही त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला.. म्हसरूळ, आडगाव, पालघर येथील कासा, औरंगाबाद येथील वाळुंज पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले, मुख्य आरोपी दिनेश कबाडे व किरण वाघचौरे याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. संशयित काजल उगरेज हिचा पती कारागृहात आहे. दरम्यान पोलीस तपास सुरु असताना संशयितांकडे गुंगीकारक औषधे मिळाली असून 21 मे रोजी त्यांनी अशाच पद्धतीने एक कार पळविल्याची कबुली दिली. या प्रकरणी  संशयितांना 26 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP MajhaNitin Gadkari launch CNG Bike : CNG बाईक लाँच, महाराष्ट्रात किंमत किती? गडकरींचं Uncut भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Embed widget