(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : तलवारीने केक कापणे पडले चांगलेच महागात, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Nashik News Update : तलवारीने केक कापल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी तलवारीस संबंधित युवकाला अटक केली आहे. शांताराम देवराम गुरगुडे असे अटल केलेल्या तरूणाचे नाव आहे.
Nashik News Update : तलवारीने केक कापणे एका युवकास चांगलेच महागात पडले आहे. तलवारीने केक कापल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी तलवारीस संबंधित युवकाला अटक केली आहे. शांताराम देवराम गुरगुडे असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.
19 जून रोजी संपूर्ण जगभरात फादर्स डे साजरा करण्यायत आला. नाशिकमध्ये देखील मोठ्या उत्साहात फादर्स डे साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील फुलेनगर येथील युवकाने फादर्स डेच्या निमित्ताने तलवारीने केक कापला. त्यामुळे नाशिक पोलिसांनी संबंधित युवकाला अटक करून त्याच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "गुन्हेशाखा युनिट क्र एकचे अंमलदार महेश साळुंके यांना गुन्हे प्रतिबंधक गस्ती दरम्यान खबऱ्यांमार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शांताराम गुरगुडे याने बेकायदेशीररित्या तलवारीने केक कापून फादर्स डे साजरा केला. याबाबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमुळे पोलिसांच्या ही बाब निदर्शनास आली. घटनेची गंभीरता पाहून पोलीस कर्मचाऱ्यांनी ही माहिती अंमलदार विजय ढमाळ यांना दिली. ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विष्णु उगले, अंमलदार सुरेश माळोदे, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, आसिफ तांबोळी, नाझिमखान पठाण, प्रशांत मरकड, महेश साळुंके, अण्णासाहेब गुंजाळ आदींचे पथक तयार करण्यात आले.
या पथकाने शहरातील फुले नगर परिसरात राहणाऱ्या शांताराम देवराम गुरगुडे याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे पोलिकांनी तलवारीबाबत विचारणा केली असता त्याने त्याच्या घरातील पलंगाखालून तलवार पोलिसांच्या स्वाधीन केली. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने शांताराम याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची पोलिसांनी गभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या