एक्स्प्लोर

Aurangabad: गाडी अडवून ट्राफिक पोलिसांनी कागदपत्रांबाबत विचारपूस करताच त्याने चाकू काढला आणि....

Crime: विशेष पथकाने काही तासाच्या आत आरोपींना शोधून काढत, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरातील जालना रोडवरील सेव्हनहीलवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सेव्हनहील चौकात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून धमकवण्यात आले आहे. एका विना नंबर दुचाकीला अडवून कागदपत्रांबाबत विचारपूस करताच त्या मोटारसायकलवर बसलेल्या तरुणाने खिशातील चाकू काढून पोलिसांना दाखवत धमकावले. मोहमद सिद्दीकी खालेद चाउस ( वय-32 वर्ष रा. सईदा कॉलणी जटवाडा रोड औरंगाबाद,  आणि सय्यदि सलमान सय्यद सउद ( वय-22 वर्ष रा. गल्ली नं. 3 रहिमनगर औरंगाबाद)  असे आरोपींचे नाव आहेत. पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. 

औरंगाबाद शहर वाहतूक पोलिसात नेमणुकीस असलेले भिमराव लक्ष्मण फलटणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,  ते आपले सहकाऱ्यासोबत सेव्हनहिल येथे कर्तव्य बजावत होते. दरम्यान संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान एक विना नंबर डबलसिट मोटारसाकल धारकांना त्यांनी संशयावरुन गाडी थांबवण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडे गाडीच्या कागदपत्रांबाबत विचारपुस केली. मात्र त्यांनी कागदपत्र दाखवत नाही असे म्हणत फलटणकर यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तर याचवेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणाने त्याचा कंबरेचा चाकु काढला. चाकू काढून फलटणकर यांना त्या तरुणाने धाक दाखवत पळ काढला. 

विशेष पथकाने शोधून काढले...

दुचाकीवरील तरुण चाकू दाखवून पळून जात असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे फोटो काढले. त्यानुसार त्यांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनतर पोलिसांनी या दुचाकीस्वार तरुणांचा शोध सुरु केला. दरम्यान विशेष पथक प्रमुख अनंता तांगडे यांना हे दोन्ही तरुण मोटारसायकलसह शहरातील अपेक्स हॉस्पीटल परिसरात फिरत असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन मोहमद सिद्दीकी आणि सय्यद सलमान यांना ताब्यात घेतले. त्यांनतर चाकू दाखवणारे आपणच असल्याची त्यांनी कबुली दिली. तसेच यावेळी त्यांच्या ताब्यातून चाकू आणि दुचाकी सुद्धा जप्त करण्यात आला. 

पोलीस अधिकाऱ्यावरही चाकू हल्ला...

या घटनेच्या दोन दिवसांपूर्वी शहरातील जिन्सी पोलीस ठाण्याचे प्रमुख व्यंकटेश केंद्र यांच्यावर त्यांच्याच पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. केंद्र यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. तर पुढील 48 तास त्यांच्यासाठी खूप महत्वाचे असणार असल्याचे सुद्धा डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget