एक्स्प्लोर

Nashik Crime: अनोळखी कॉल उचलण्यापूर्वी सावधान! नाशिकमध्ये डॉक्टरची फसवणूक, गुन्हा दाखल

Nashik Crime News: नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांबरोबर सायबर क्राईमच्या (Nashik Cyber Crime News)  घटना देखील समोर येत आहेत.

Nashik Crime News: नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांबरोबर सायबर क्राईमच्या (Nashik Cyber Crime News)  घटना देखील समोर येत आहेत. यामध्ये सुशिक्षित नागरिक देखील फसत असल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील एका डॉक्टरांना सायबर क्राईमचा फटका बसला आहे.
 
नाशिकच्या शरणपूर रोड येथील एका वैद्यकीय व्यावसायिकाला सायबर भामट्याने दोन लाख 76 हजार 100 रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वैद्यकीय व्यवसायिक डॉ. सुदर्शन विजय पवार यांना एका सायबर भामट्याने बारा अंकी क्रमांकावरून फोन कॉल करून ब्लू डॉट कंपनीकडून बोलत असल्याचे सांगितले. यामध्ये प्रोसेस फीच्या नावाखाली फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. एक अनोळखी लिंक द्वारा ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर ऑनलाईन पेजवर यूपीआय पिन देण्यास भाग पाडून फोन पे खाते क्रमांक लिंक असणाऱ्या तीन खात्यातून यूपीआय द्वारे एकूण दोन लाख 76 हजार रुपये विविध खात्यांवर डेबिट करून डॉ. सुदर्शन पवार यांची आर्थिक फसवणूक केली. त्यामुळे डॉक्टर सुदर्शन पवार यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. 
 
एकीकडे सायबर क्राईमच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून मोबाईल हातातलं साधन झाल्याने अनेकजण याचा गैरवापर करताना आढळत आहेत. त्यामुळे अनेक क्लुप्त्या वापरून बँक खाते रिकामे होण्याची शक्यता असते. आता प्रत्येकजण अँड्रॉइड मोबाईल फोन वापरतो. त्यामुळे अनेकदा मोबाईलवर विविध नावाने असंख्य लिंक येतात. मात्र, कुठल्याही अनोळखी लिंक डाउनलोड किंवा ओपन केल्यास आपण पुन्हा नव्या लिंककडे जात असतो. यातून लुटारू टोळीकडे तुमच्या ऑनलाईन व्यवहाराची सर्व माहिती आणि इतर अपडेट पोहचते. मग टोळी त्वरित तुमच्या बँकेवर डल्ला मारून बँक खाते रिकामे होते. 
 
व्हाट्सअॅपवरूनही फसवणूक....

सध्या व्हाट्सअॅप वापरणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अनेकदा लुटारू हे फसव्या लिंक पाठवून ग्राहकांना आकर्षित करत असतात. अनेकदा मोबाईल धारक सहजरित्या या लिंक ओपन करून पाहतात. अन आपसूक मोबाईल धारकाची बँक डिटेल्स चोरट्याकडे जाते. त्यामुळे बँक असो किंवा इतर कुठलेही शासकीय विभाग कधी लिंक पाठवत नाही. मोबाईलवर येणाऱ्या असंख्य लिंक या फसव्या असतात. याची दखल घेऊन कुठल्याही प्रकारे लिंक डाउनलोड किंवा लिंकद्वारे व्यवहार करू नका, अन्यथा ऑनलाईन भामटे हे तुमच्या व्यवहारावर लक्ष केंद्रित करीत आहेत. लिंक आली म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही. तेव्हा अशा बनावट लिंकला बळी पडू नका, सतर्क राहा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget