नाशिक हादरलं! जळालेल्या कारमध्ये आढळला बेपत्ता महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह
Nashik Crime : बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवलेल्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या कारमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे.
Nashik Crime : नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी महिलेचा मृतदेह जळालेल्या कारमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतावस्थेत आढळलेल्या महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. मात्र, काल रात्रीच्या सुमारास पोलिसांना एका कारला आग लागली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ही घटना समोर आली.
सुवर्णा वाजे असे मृत महिलेचे नाव आहे. सुवर्णा वाजे या नाशिक महानगरपालिकेत कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. मंगळवारी रात्रीपर्यंत त्या कामावरून घरी न परतल्याने त्यांच्या पतीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांना मंगळवारी रात्रीच्या सुमारास वाडीवऱ्ह गावाजवळ एक कार जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. या कारमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.
सुवर्णा वाजे या काल, मंगळवारी दुपारी 4.30 वाजता घरातून महापालिका रुग्णालयात कामावर गेल्या होत्या. रात्री 9 वाजून गेल्यानंतरदेखील पत्नी घरी न आल्याने बांधकाम व्यावसायिक असलेल्या पतीने तिला मेसेज केला. त्यावेळी पत्नीच्या मोबाइलमधून 'मी कामात आहे, वेळ लागेल,' असा रिप्लाय दिला मात्र त्यानंतर मोबाईल स्विच ऑफ आला. त्यानंतर पतीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास नाशिक मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्ह गावाजवळ जळालेल्या कारमध्ये या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली.
ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली असून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही हत्या आहे की अपघात आहे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- घरगुती वादातून गोळ्या झाडून सुनेकडून सासूची हत्या; यवतमाळमधील घटनेने खळबळ
- Nandurbar News : कडाक्याच्या थंडीचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम; कशी घ्याल काळजी?
- तिसऱ्या लाटेत सध्या 90 ते 95 टक्के बेड्स रिकामे, राज्याच्या दृष्टीनं आधार देणारी बाब : आरोग्यमंत्री
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha