एक्स्प्लोर

Nashik Crime : अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराच्या घरात चोरी, मोलकरणीनेच केली हातसफाई, आमदार पावसाळी अधिवेशनात असतानाच पैशांवर मारला डल्ला

Nashik Crime : देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Nashik Crime : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता तर चक्क आमदारांच्याच घरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीच्या (NCP) आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांच्या नाशिकमधील जेलरोड येथील निवासस्थानी चोरी झाली आहे. या प्रकरणी त्यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीविरुद्ध घरफोडी व चोरीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोलकरीण संगीता श्याम केदारे (रा. जेल रोड) हिने कपाटातून एक लाख रुपयांची रोकड चोरल्याचा आरोप असून, पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी डॉ. प्रवीण रामदास वाघ यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी (दि. 6 जुलै) दुपारी संगीता केदारे हिने कपाटातून एक लाख रुपये चोरून नेले. या काळात आमदार सरोज अहिरे या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत होत्या. या काळातच मोलकरणीने पैशांवर डल्ला मारलाय.   

मोलकरणीला पोलिसांकडून अटक

यासोबतच ऑक्टोबर 2024 ते 15 जुलै 2025 या कालावधीत घरातून वेळोवेळी रोख रक्कम चोरून नेल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रवीण वाघ यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलिसांनी संगीता केदारे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मोलकरणीला ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

मंगलमूर्तीनगरातून 22 तोळे सोने, दीड किलो चांदी लंपास

दरम्यान, मोठ्या भावाकडे सहकुटुंब जेवणासाठी गेलेल्या लहान भावाच्या घरी गुरुवारी रात्री धाडसी घरफोडी झाली असून, सुमारे 22 तोळे सोन्याचे, दीड किलो चांदीचे व रोख रक्कम दहा हजार रुपये असा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. लहान भावाची पत्नी वैशाली किशोर मैद (45, रा. गौरी मंगल सोसायटीजवळ, मंगलमूर्तीनगर, कॅनॉल रोड, जेलरोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या नातेवाइकांकडे जेवणासाठी गेले होते. जेवण करून रात्री सव्वाअकराच्या दरम्यान घरी परतले तेव्हा घराचा कडी कोयंडा तोडलेला आढळून आला तसेच घरातील कपाटातील वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या दिसून आल्या व कपाटातील मुख्य लॉकरमधून सुमारे साडेएकवीस तोळे सोन्याचे दागिने व दीड किलो चांदीचे दागिने, त्यात गणपती उत्सवाकरिता केलेली आभूषणे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस तपास करीत आहेत. 

आणखी वाचा 

Nashik Crime News: कौटुंबिक वाद की प्रेम संबंध? 16 वर्षीय विद्यार्थिनीने होस्टेलमध्ये संपवलं जीवन, दोन महिन्यांपूर्वी आलेली राहायला अन्...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident : वॉटरपार्कमध्ये भीषण अपघात, स्लाइडवरून पडल्याने सहलीसाठी गेलेल्या महिलेचे अर्धे शरीर कायमस्वरुपी निकामी
वॉटरपार्कमध्ये भीषण अपघात, स्लाइडवरून पडल्याने सहलीसाठी गेलेल्या महिलेचे अर्धे शरीर कायमस्वरुपी निकामी
संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला चोपला
संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला चोपला
Pune Crime: पुण्यात गोपीचंद पडळकरांचा हिंदू जनआक्रोश मोर्चा रोखला, खडी मशीन चौकात जाण्यापूर्वीच थांबवलं, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पुण्यात गोपीचंद पडळकरांचा हिंदू जनआक्रोश मोर्चा रोखला, खडी मशीन चौकात जाण्यापूर्वीच थांबवलं, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
धक्कादायक! मित्राने वाढदिवसाला बोलावलं नाही, युवकाने संपवलं जीवन; मोबाईलवर ठेवलं अखरेचं स्टेटस
धक्कादायक! मित्राने वाढदिवसाला बोलावलं नाही, युवकाने संपवलं जीवन; मोबाईलवर ठेवलं अखरेचं स्टेटस

व्हिडीओ

Rahuri Election: राहुरीत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याची अपक्ष उमेदवारी; रावसाहेब खेवरेंचा भाजपवर हल्ला
Sanjay Savkare Nandurbar : सुनेत्रा पवार बारामतीतून निवडून येणार- संजय सावकारे
Ashok Kharat On Nashik Court : अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी
Samarjeet Ghatge Join BJP : फडणवीस थोरल्या भावासारखे, भाजपात जाताच समरजीत घाटगेंकडून कौतुक
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या मतांशी सहमत, अजितदादांनी देखील पोटनिवडणूक लढवलीच होती- संजय राऊत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market :  सेन्सेक्स आणि निफ्टीचं जोरदार कमबॅक, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, एका दिवसात 17 लाख कोटींची कमाई  
सेन्सेक्स आणि निफ्टीचं जोरदार कमबॅक, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, एका दिवसात 17 लाख कोटींची कमाई  
संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला चोपला
संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला चोपला
शिकाऱ्याचीच 'शिकार' झाली? 'निशस्त्र' गाझा संपवल्यानंतर आता लेबनाॅन, इराणला संपवण्याचा नादात ट्रम्पनंतर नेत्यानाहूंची राजकीय अन् लष्करी कोंडी!
शिकाऱ्याचीच 'शिकार' झाली? 'निशस्त्र' गाझा संपवल्यानंतर आता लेबनाॅन, इराणला संपवण्याचा नादात ट्रम्पनंतर नेत्यानाहूंची राजकीय अन् लष्करी कोंडी!
US-Iran War Ceasefire : ईराण-अमेरिका युद्धविरामात पाकिस्तान नाही, चीन खरा खेळाडू? नेमकं काय घडलं?
ईराण-अमेरिका युद्धविरामात पाकिस्तान नाही, चीन खरा खेळाडू? नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा, दिव्यांग बांधवांचा धडक मोर्चा; कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा, दिव्यांग बांधवांचा धडक मोर्चा; कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Iran US War Ceasefire Inside Story: सगळी तयारी झालेली, डेडलाईन संपण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोघांना फोन फिरवला; सगळा प्लॅन बदलला, इराण-अमेरिकेचं युद्ध कसं थांबलं?, Inside Story
सगळी तयारी झालेली, डेडलाईन संपण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोघांना फोन फिरवला; सगळा प्लॅन बदलला, इराण-अमेरिकेचं युद्ध कसं थांबलं?, Inside Story
धक्कादायक! मित्राने वाढदिवसाला बोलावलं नाही, युवकाने संपवलं जीवन; मोबाईलवर ठेवलं अखरेचं स्टेटस
धक्कादायक! मित्राने वाढदिवसाला बोलावलं नाही, युवकाने संपवलं जीवन; मोबाईलवर ठेवलं अखरेचं स्टेटस
RBI Repo Rate: युद्धामुळे मंदीचं सावट, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट स्थिर ठेवला, EMI भरणाऱ्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?
युद्धामुळे मंदीचं सावट, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट स्थिर ठेवला, EMI भरणाऱ्यांवर काय परिणाम होणार?
Embed widget