एक्स्प्लोर

प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांनी सर्व धर्मात सडके आंबे निघतातच असं म्हटलं आहे. पीडित महिलांसोबत सरकार उभं असल्याचं ते म्हणाले.

Nitesh Rane News पुणे : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या प्रकरणावरुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांचे फोटो अशोक खरातबरोबर व्हायरल झाले आहेत. अशातच या प्रकरणावर मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणातील पीडित महिलांनी थेट सरकारशी संपर्क साधावा, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे. 

प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही “सडके आंबे” निघतातच, त्यामुळे सरकार महिलांच्या बाजूने ठामपणे उभे आहे. तसेच, या भोंदू बाबाचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध असल्याच्या प्रश्नावर त्यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न करत अधिक बोलणे टाळले. विरोधकांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, हिंदू धर्माची बदनामी होत असताना काही जणांना त्यातच आनंद मिळतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. ते पिंपरी- चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याचे एक एक कारनामे समोर

नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात याचे एक एक कारनामे समोर येत आहे. राजकीय वरदहस्तामुळे त्याचे काळे कारनामे सुरू होते. अनेक महिलांचे लैंगिक शोषण त्याने केले. त्याचे 100 हून अधिक व्हिडिओ समोर आले आहेत. इतकेच नाही तर दमदाटी करून, धमक्या देऊन त्याने मोक्याच्या जमिनीही लाटल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे गोरखधंदे अजूनही बाहेर येत आहेत. तर या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची पहिली विकेट पडली आहे. त्यांनी काल पदाचा राजीनामा सोपवला. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 

चौकशीसाठी  IPS तेजस्विनी सातपुतेंच्या नेतृत्वात एसआयटी पथक 

अशोक खरात याचा ऑफिस बॉय नीरज जाधव याने महिलांसोबतच्या दृषकृत्याचे व्हिडिओ काढल्याचा संशय आहे. शिर्डीतील एका पीडितेला आणि खरात याला ब्लॅक करण्यासाठी त्याने एक व्हिडिओ लीक केला आणि या प्रकरणाचे बिंग फुटले. याप्रकरणी IPS तेजस्विनी सातपुतेंच्या नेतृत्वात एसआयटी पथक स्थापन करण्यात आले आहे. SIT च्या पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील 12 वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कॅप्टन खरात प्रकरणात दाखल 3 गुन्ह्यांचा वेगाने तपास सुरू आहे. व्हिडीओतुन तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचं समोर आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Wardha Accident News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'

Embed widget