एक्स्प्लोर

Nanded Crime: युवकाच्या हत्येने नांदेड हादरले, चाकू हल्ला करत रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावरच टाकलं, दोन्ही आरोपी फरार

या घटनेने संपूर्ण नांदेड शहर हादरले आहे .शहरात दिवसाढवळ्या रस्त्याच्या मधोमध दोन तरुणांनी केलेल्या चाकू हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला

Nanded crime: राज्यात दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या,निर्घृणपणे होणारे खून ,धाकदपट , किरकोळ कारणांवरून मारहाण दररोज कानावर पडत असताना नांदेड शहर आज (26 फेब्रुवारी ) सकाळी युवकाच्या हत्येने हादरले . नांदेड शहरातील गणेश नगर भागात आज सकाळी दोघांनी एका तरुणावर चाकू हल्ला करत रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावरच टाकून दिलं .सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान हा हल्ला झाला .रस्त्याच्या मधोमध रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून स्थानिकांचे धाबे दणाणले आहे .अमोल भुजबळ असे मृत्य युवकाचे नाव आहे . गणेशनगर भागातील वाय कॉर्नरवर झालेल्या या हत्याकांडाने परिसरात मोठी दहशत पसरलीय . (Nanded crime)

या घटनेने संपूर्ण नांदेड शहर हादरले आहे .शहरात दिवसाढवळ्या रस्त्याच्या मधोमध दोन तरुणांनी केलेल्या चाकू हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला .रक्तबंबाळ अवस्थेत  पडलेल्या तरुणाला पाहून परिसरातील स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली .यानंतर घटनास्थळी रुग्णवाहिकेसह पोलीस अधिकारी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा सुरू आहे .पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवलाय .ही हत्या नेमकी कशामुळे झाली याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही .अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे .(Murder Nanded)

नांदेड शहर हादरले, तरुणाची चाकूने भोसकून हत्या

नांदेड शहरातील गणेश नगर भागात आज (26 फेब्रुवारी )सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान दोन तरुणांनी एका तरुणावर चाकू हल्ला केला .या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला .गणेश नगर परिसरातील वाय कॉर्नरवर  मृतदेह तसाच टाकून हल्लेखोर फरार झाले . या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे .घटनेची माहिती समजतात पोलीस आणि रुग्णवाहिका परिसरात दाखल झाली .घटनास्थळी या हत्याकांडाने मोठी खळबळ उडाली आहे .पोलिसांनी मृतदेहाला ताब्यात घेतले असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत असल्याचे सांगितले .घटनेचा पुढील तपास नांदेड शहर पोलीस करत आहेत .हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली हे अद्याप अस्पष्ट असून अधिक तपास सुरू आहे .

हेही वाचा:

Mumbai Crime: संसार मोडला, जावयाच्या मस्तकात सूडाग्नी पेटला, हातोडीने मारुन सासूला पेटवून दिलं; मुंबईतील धक्कादायक घटना

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

एकमेकाकडं पाहण्याच्या कारणावरुन वाद, परांड्यात भर चौकात तुंबळ हाणामारी, अनेकजण जखमी
एकमेकाकडं पाहण्याच्या कारणावरुन वाद, परांड्यात भर चौकात तुंबळ हाणामारी, अनेकजण जखमी
सैन्यदलातील जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवलं, वाशिम जिल्ह्यात खळबळ, दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप
सैन्यदलातील जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवलं, वाशिम जिल्ह्यात खळबळ, दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget