एक्स्प्लोर

Mumbai Crime: संसार मोडला, जावयाच्या मस्तकात सूडाग्नी पेटला, हातोडीने मारुन सासूला पेटवून दिलं; मुंबईतील धक्कादायक घटना

Mulund crime news: मुलुंडच्या नाणेपाडा परिसरात एका व्यक्तीने आपल्या सासूला जाळून ठार मारल्याचा प्रकार समोर आला आहे. नवघर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

मुंबई: सासूच्या कट-कारस्थानांमुळे संसार मोडल्याच्या रागातून मुंबईतील एका व्यक्तीने आपल्या सासूला पेटवून देत तिची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी ही घटना घडली होती, तेव्हा पोलिसांना (Mumbai Police) या सगळ्याचा अंदाज नव्हता. मात्र, नंतर झालेल्या तपासावेळी जावई आणि सासूमधील (Mother In law) वादामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुलुंड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. बाबी दाजी उसरे (वय 72) असे मृत महिलेचे नाव आहे. कृष्णा अटनकर (वय 59) हा बाबी उसरे यांचा जावई होता. कृष्णा अटनकर आणि बाबी उसरे यांच्या मुलीचे लग्न झाले होते. कृष्णा अटनकर आणि त्यांच्या पत्नीची अनेकदा भांडणे व्हायची. याच कौटुंबिक कलहाला कंटाळून कृष्णा अटनकर यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती. या दोघांचा दहा वर्षांपूर्वी घटस्फोट (Divorce) झाला होता. यासाठी आपली सासू बाबी उसरे कारणीभूत असल्याचा राग कृष्णा यांच्या मनात होता. 

कृष्णा हा ड्रायव्हर होता. कृष्णा आणि त्याच्या पत्नीचा दहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. संसार मोडल्यानंतर कृष्णाची माजी पत्नी मुलुंड येथील आपल्या आईच्या घरी राहायला गेली होती. ती आपल्या 20 वर्षांच्या मुलासोबत तिकडे राहत होती. कृष्णा अनेकदा त्यांना भेटायला मुलुंडला जायचा. यावरुन कृष्णा आणि बाबी उसरे यांच्यात वाद झाला होता. तो सोमवारी सकाळी आठ वाजता बाबी उसरे यांच्या घरी गेला होता. बाबी उसरे यांना रुग्णालयात तपासणीसाठी जायचे असल्याने कृष्णा त्यांना आपल्या मिनी टेम्पोतून घेऊन निघाला होता. कृष्णाने घरापासून काही अंतरावर टेम्पो पार्क केला होता. नाणेपाडा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कृष्णा टेम्पोच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. कृष्णाने बाबी उसरे यांना टेम्पोच्या मागच्या भागात बसवले होते.

बाबी उसरे टेम्पोच्या मागच्या भागात बसल्यानंतर कृष्णाने टेम्पोचा दरवाजा आतून लावून घेतला. त्यानंतर कृष्णाने अचानक हातोडी काढून बाबी उसरे यांच्या डोक्यावर तीन-चारवेळा मारले. त्यामुळे बाबी उसरे बेशुद्ध पडल्या. ही संधी साधून कृष्णा अटनकर याने बाबी यांच्या अंगावर पेट्रोल आणि थिनर ओतून त्यांना पेटवून दिले. त्यानंतर कृष्णाने स्वत:च्या अंगावरही पेट्रोल आणि थिनर ओतून घेत आत्महत्या केली. या परिसरातून जाणाऱ्या एका व्यक्तीला टेम्पोतून आगीच्या ज्वाळा बाहेर निघत असल्याचे दिसले. त्याने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवून टेम्पोचे दार उघडले तेव्हा आतमध्ये हातोडी, रॉकेलची बाटली,लायटर आणि बाबी व कृष्णा यांचे मृतदेह आढळले होते.

या प्रकरणी मुलुंडच्या नवघर पोलिसांनी सुरुवातीला अपमृत्यूची नोंद केली होती. बाबी उसरे आणि कृष्णा अटनकर या दोघांनी आत्महत्या केली असावी, असे पोलिसांना वाटले होते.  मात्र, चौकशीनंतर हा हत्येचा प्रकार असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यातील कलमात वाढ केली.

आणखी वाचा

ठाण्यात गतीमंद मुलीला वेदना असह्य, आई अन् आजीने गुंगीच्या गोळ्या देऊन मारुन टाकलं, साताऱ्यातील गावी नेऊन अंत्यसंस्कार उरकले

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Wardha Accident News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Embed widget