एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Crime News : डीजे वाजवण्यावरून वाद, नांदेडमध्ये निर्दयीपणे तरूणाला संपवलं 

Nanded Crime News  : जे वाजवण्यावरून वाद झाल्याने नांदेडमध्ये निर्दयीपणे तरूणाला संपवलं आहे. काल रात्री उशीरा ही घटना घडली आहे.  

Nanded Crime News  : नांदेड शहरातील कर्मवीरनगर परिसरात लग्न समारंभात डीजे वाजवण्याच्या कारणावरून तरुणाचा  निर्दयीपणे खून करण्यात आलाय.  शेख मोईन (वय, 22) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. हत्येनंतर मोईनच्य कुटुंबीयांनी त्याच्या मृतदेहासह पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. परंतु, पोलिसांनी कुटुंबीयांनाच ताब्यात घेतले. खून करणाऱ्याला वाऱ्यावर सोडून मयताच्या भाऊ आणि वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने कुटुंबीयांनी संताप व्यक्त केलाय. ही घटना काल रात्री नांदेडमधील नमस्कार चौक परिसरातील कर्मवीर नगर येथे घडली आहे.  

नांदेडमधील कर्मवीर नगर येथील शेख कुटुंबातील विवाह सोहळ्याचा काल स्वागत समारंभ होता. या स्वागत समारंभासाठी डीजे सांगण्यात आला होता. परंतु, डीजे लावण्याच्या कारणावरून तरूणांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की,  सात ते आठ तरुणांनी शेख मोईन शेख याच्यावर चाकूने सपासप वार केले. यात मोईनचा जागीच मृत्यू झाला.    

मृत पावलेल्या युवकाचे वडील, भाऊ, चुलत भाऊ आणि मामांनाच पोलिसांनी अटक केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मोईनचा मृतदेह प्रेत विमानतळ पोलिस ठाण्यात आणून ठिय्या आंदोलन केले. मृतदेह पोलिस ठाण्यात आणल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दरम्यान, नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार  खून प्रकरणातील मुख्य सुत्रधारास सोडून मृताच्याच नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने नातेवाईकांना सोडून द्यावे, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतलाय.  याविषयी पोलिसांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तूर्तास यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. या प्रकरणामुळे नांदेड शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत मोईन याच्या कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणावर पोलिसांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे की नाही याबाबत देखील अद्याप माहिती मिळालेली नाही. 

महत्वाच्या बातम्या

BMC अधिकारी असल्याचं सांगत 10 हजारांची लाच मागितली, नंतर केला चोरीचा प्रयत्न, आरोपी अटकेत 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhanajay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal On NCP Result : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनमान्यता - छगन भुजबळChandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?Prakashrao Abitkar : जनता माझ्यासोबत असल्यानंच माझा विजय - प्रकाश आबिटकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhanajay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly Election Results 2024: बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
Embed widget