Nanded Crime : पहाटे झोपेत असलेल्या गरोदर पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या, आरोपी पती पोलिस ठाण्यात हजर
Nanded Crime News : आरोपी हा भारतीय सैन्यदलात असून त्याने हे हत्याकांड केल्यानंतर स्वतः पोलिस ठाण्यात हजर राहून त्याची माहिती दिली.
नांदेड: गरोदर पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची पतीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली. हत्येनंतर आरोपी पती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. कंधार तालुक्यातील बोरी येथे हे हत्याकांड घडले. एकनाथ जायभाये असं आरोपीचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी एकनाथ जायभाये हा सैन्यदलात आहे. राजस्थान मधील बिकानेरमध्ये सध्या तो नियुक्त आहे. बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास पत्नी आणि चार वर्षांची मुलगी सरस्वती दोघे झोपेत असताना त्यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. पत्नी भाग्यश्री ही आठ महिन्यांची गरोदर होती. हत्येनंतर आरोपी एकनाथ जायभाये हा स्वतः माळाकोळी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला.
आरोपीने या घटनेची माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती. भाग्यश्री जायभाये यांचा विवाह 2019 साली एकनाथ जायभाये यांचा सोबत झाला होता. त्यानंतर त्याला एक मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर मुलगा का झाला नाही असे म्हणत भाग्यश्रीला माहेरी जाऊन पैसे आण म्हणत तिचा छळ सुरू केला होता. तशी तक्रार भाग्यश्रीच्या आईने केली असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.
बीडमध्ये पत्नी-पत्नीचा वाद टोकाला, गळफास लावून केली दोघांनी आत्महत्या
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे धक्कादायक घटना समोर आली असून, पती-पत्नीमध्ये अचानक सुरू झालेल्या वादाचे पर्यावसान आत्महत्येमध्ये झाले. ज्यात घरात पती-पत्नीने सोबतच गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे. या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. राजू बंडू चव्हाण (वय 31 वर्षे) आणि सोनाली राजू चव्हाण (वय 27 ववर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीचे नावं आहेत.
अधिक माहिती अशी की, जातेगाव येथील राजू बंडू चव्हाण हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. गावात फिरून चक्कर मारली. यानंतर जातेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणीय उपोषणास सुरु होते. या उपोषणाला भेट देऊन ते घरी परतले. घरी गेल्यावर त्यांनी कुटुंबासोबत जेवणही केले. परंतु जेवणांनतर पती-पत्नीत टोकाचे भांडण झाले. वाद एवढा टोकाला गेला की, दोघांनी सोबतच घरातील आडूला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.
ही बातमी वाचा: