कापसाच्या शेतात केली गांजाची लागवड, गुन्हा दाखल, अडीच लाखांचा गांजा जप्त
Maharashtra Nanded Crime News : कापसाच्या शेतात केली गांजाची लागवड. तीन शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अडीच लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
Nanded Crime News : नांदेडमधील (Nanded) किनवट तालुक्यात (Kinvat Taluka) तीन शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तीन शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या शेतात (Cotton Fields) विनापरवाना बेकायदेशीर गांजाची लागवड (Cultivation of Illegal Marijuana Without a License) केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकानं ही कारवाई करत गांजा ताब्यात घेतला आहे.
किनवट तालुक्यातील चंद्रपूर येथील एका शिवारात तीन शेतकऱ्यांनी संगनमत करत विनापरवाना बेकायदेशीर गांजाची लागवड केली. कापसाच्या शेतात तिघांनीही गांजाची लागवड केली होती. यासंदर्भातील माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई करून तब्बल 52 किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई काल (रविवारी) दुपारी अडीचच्या सुमारास करण्यात आली आहे.
किनवट तालुक्यातील चंद्रपूर शिवारात येथील तीन शेतकऱ्यांनी कापसाच्या शेतात चक्क गांजाची लागवड केली आहे. आपल्या शेतात बेकायदेशीरित्या एनडीपीएस कायद्याचा भंग करत अंमली पदार्थ गांजाच्या झाडांची लागवड केल्याची माहिती गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांना मिळाली होती. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं चंद्रपूर शिवारातील कापसाच्या शेतावर कारवाई केली. कारवाईमध्ये गुन्हे शाखेनं शेतातील तब्बल 52 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. या गांजाची किंमत तब्बल दोन लाख 61 हजार चारशे रुपये असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वतीनं देण्यात आली आहे. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांच्या फिर्यादीवरून किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांजा आरोग्यासाठी हानिकारक, स्मरणशक्तीवर होतो परिणाम
मारिजुआना हा एक अंमली पदार्थ आहे. ज्याचं सेवन धूम्रपानाच्या स्वरूपात किंवा गोळीच्या स्वरुपात केलं जातं. त्याचं जास्त सेवनं केल्यानं मेंदूच्या विकासावर परिणाम होतो, तसेच स्मरणशक्तीवरही परिणाम होऊ शकतो. यामुळे नैराश्य आणि इतर मानसिक आरोग्य समस्या देखील उद्भवतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Hemp Online Selling : आता ऑनलाईन गांजा मिळणार? फूड डिलिव्हरी कंपनीची सेवा