Nanded Crime News :भरदिवसा मुलीचं अपहरण करणं पडलं महागात! जिथून मुलीला बळजबरीनं उचललं तिथूनच पोलिसांनी काढली आरोपीची धिंड
Nanded Crime :ज्या ठिकाणाहून आरोपी महोमद खाजा याने तरुणीचे अपहरण केले होते, त्याच भागातून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकत त्याची धिंड काढली .

Nanded crime : भरदिवसा तरुणीचे अपहरण करणाऱ्या आरोपीची आज नांदेड पोलीसांनी धिंड काढली .. काल ( 30 जुलै ) नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून काल दोघांनी एका तरुणीचे अपहरण केले होते . मुलीचा बळजबरीने उचलून दुचाकीवरुन नेतानाचा व्हिडियो देखील व्हायरल झाला होता .. दरम्यान काही तासात पोलीसांनी त्या तरुणीची सुखरुप सुटका केली होती .
जिथून मुलीला उचललं, तिथूनच पोलिसांनी काढली धिंड
भरदिवसा तरुणीचे अपहरण करणाऱ्या आरोपीची आज नांदेड पोलीसांनी धिंड काढली ... काल नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून काल दोघांनी एका तरुणीचे अपहरण केले होते .. मुलीचा बळजबरीने उचलून दुचाकीवरुन नेतानाचा व्हिडियो देखील व्हायरल झाला होता .. दरम्यान काही तासात पोलीसांनी त्या तरुणीची सुखरुप सुटका केली होती .. 23 वर्षीय आरोपी महोमद खाजा आणि अन्य एक अल्पवयीन आरोपीला वजिराबाद पोलीसांनी अटक केली .. आज आरोपी महोमद खाजा याला बेड्या ठोकून रेल्वे स्टेशन परिसरात त्याची धिंड काढण्यात आली ... ज्या ठिकाणाहून आरोपी महोमद खाजा याने तरुणीचे अपहरण केले होते, त्याच भागातून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकत त्याची धिंड काढली .
आरोपी व तरुणीची जुनी ओळख, वाद झाला अन् ..
आरोपी आणि त्या तरुणीची जूनी ओळख होती .. काल आरोपी तिला भेटायला गेला होता .. दोघांमध्ये वाद झाला त्यातून आरोपी खाजा याने तरुणीला बळबरीने उचलून नेले होते असं पोलीसांनी संगीतल ..अपहरणाच्या काही तासातच वजिराबाद पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतलं आणि तरुणीची सुखरूप सुटका केली.
प्राथमिक चौकशीत आरोपी आणि पीडित तरुणी यांच्यात पूर्वीपासून ओळख असल्याचं समोर आलं. काल दोघांची भेट झाली होती, त्यावेळी वाद झाल्यानंतर संतप्त झालेल्या खाजा याने पीडितेला बळजबरीने उचलून नेलं, असं पोलिसांनी सांगितलं.
























