एक्स्प्लोर

Nanded : नांदेडमध्ये अवतरले चक्क पाकिस्ताननगर; पोलिस प्रशासनही चक्रावले!

Nanded News : नांदेड शहरात विविध गुन्ह्यांच्या घटनांनी सध्या धुमाकूळ घातला आहे. आता नांदेडमध्ये चक्क 'पाकिस्ताननगर' नावाचा भाग अवतरल्याचं हे प्रकरण आहे. 

Nanded News Updates : नांदेड शहरात विविध गुन्ह्यांच्या घटनांनी सध्या धुमाकूळ घातला आहे. शहरातील आरोपीचं दहशतवाद्यांशी कनेक्शन, हत्या, चोरी अशा गुन्ह्यांनी नांदेड सध्या चर्चेत आलं आहे. अशात आता एक नवीन प्रकार समोर आल्यानं पोलिस देखील चक्रावून गेले आहेत. नांदेडमध्ये चक्क 'पाकिस्ताननगर' नावाचा भाग अवतरल्याचं हे प्रकरण आहे. 

त्याचं झालं असं की, नांदेड शहरातील देगलूर नाका भागात असलेल्या  शेख खलील या 25 वर्षीय तरुणाने आपल्या भावाच्या मुलासाठी ऑनलाईन अॅपवरून कपडे मागविले होते. त्याला लिहिता-वाचता येत नसल्याने त्यानं व्हाइस रेकॉर्ड करून पत्ता पाठवला. परंतु गैरसमजातून समोरील कंपनीने पार्सलवर शेख खलील यांच्या नावाच्या खाली 'पाकिजानगर' ऐवजी 'पाकिस्ताननगर' नांदेड असा पत्ता टाकला. त्यामुळे खलिलला थेट पोलीस ठाणे गाठावे लागले. 

कारण पाकिजानगर ऐवजी पाकिस्ताननगर असा पत्ता, छापून असलेले पार्सल नांदेडात दाखल झाले आणि ते कुरिअर खलील याला मिळल्यानंतर त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इतवारा पोलिसांपर्यंत पोहोचला. सदर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आणि लगेच त्यांनी चौकशी सुरु केली. यामुळं शेख खलील याला चौकशीसाठी पोलि स्थानकात बोलवण्यात आले. 

त्याची तपासणी करण्यात आली असता कोलकाता येथील संबधित कंपनीशी नांदेड पोलिसांनी संपर्क साधला. त्यानंतर हा सर्व प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे पुढे आले आहे. परंतु सोशल मीडियावर मात्र हा व्हिडिओ व्हायरल करून सामाजिक सामाजिक सलोखा बिघडवण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सदर व्हिडीओ सोशल माध्यमावर व्हायरल केल्यास आणि त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य खराब केल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. 

एका तरुणाच्या छोट्याशा चुकीमुळं पोलिस प्रशासन कामाला लागलं. आजकाल अनेक जण ऑनलाईन अॅपवरूनच वस्तूंची खरेदी करत आहेत. त्यामुळं त्यासाठी पत्ता आणि इतर माहिती देताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Nanded Case : हरियाणातून अटक केलेल्या दहशतवाद्यांचा महाराष्ट्र एटीएस ताबा घेणार, म्होरक्या अद्याप फरार

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
मालेगावात भीषण अपघातात दुचाकीवरील महिला ठार; चिमुकल्यालाही दुखापत, रिक्षातून रुग्णालयात
मालेगावात भीषण अपघातात दुचाकीवरील महिला ठार; चिमुकल्यालाही दुखापत, रिक्षातून रुग्णालयात
संतापजनक! तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी तुडवलं, पार्श्वभागात पेट्रोल टाकून..; लातूर हादरलं
संतापजनक! तरुणाला नग्न करून अमानुष मारहाण; पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी तुडवलं, पार्श्वभागात पेट्रोल टाकून..; लातूर हादरलं
तुझं काम करुन देतो, मी मंत्र्यांचा पीए आहे; आर्थिक लूट करणाऱ्या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
तुझं काम करुन देतो, मी मंत्र्यांचा पीए आहे; आर्थिक लूट करणाऱ्या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
“दहा हजार मते जर बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल''; फडणवीसांची मश्किल टिपण्णी
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Embed widget