तिकीट सेकंड क्लासचे पण प्रवास फर्स्ट क्लासच्या डब्यातून, टीसीने जाब विचारल्यानंतर प्रवाशाकडून हॉकी स्टीकने मारहाण
Nalasopara Crime : प्रवाशाला जाब विचारणाऱ्या टीसीला हॉकी स्टीकने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Nalasopara Crime : पश्चिम रेल्वेत तैनात असलेल्या 29 वर्षीय तिकीट तपासकाला एका प्रवाशाने हॉकी स्टिकने मारहाण केल्याची घटना घडली आहे.
विजयकुमार पंडित असं 29 वर्षीय तिकीट तपासणीसच नाव आहे. प्रवाशाला तिकीटाबद्दल जाब विचारल्यामुळे टीसाला मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार नालासोपारा रेल्वे स्थानकावर घडलाय.
तिकीट सेकंड क्लासचे पण प्रवास फर्स्ट क्लासच्या डब्यातून
अधिकची माहिती अशी की, गुरुवारी (दि. १९) सप्टेंबर रोजी सकाळी 8.83 वाजता नालासोपारा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एक प्रवाशी फर्स्ट क्लासच्या डब्यातून उतरला टीसीने त्याची तिकीट तपासल्यावर त्याची तिकीट सेकंड क्लासच्या डब्याची निघाली. टीसीने त्या प्रवाशाला दंड ठोठावला. मात्र एक तासाने पुन्हा तो प्रवासी नालासोपारा रेल्वे स्थानकावर आला. तासाभरानंतर येऊन त्याला टीसीला जबर मारहाण केली आहे. यामध्ये टीसीच्या कानाला मार लागला आहे. सध्या वसई रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपीचा शोध सुरु आहे. रेल्वे टिसीला प्रवाशाने मारहाण केल्याची पश्चिम रेल्वेतील ही दुसरी घटना आहे.
डंपरच्या चाकाखाली आल्याने 13 वर्षीय मुलाचा मृत्यू
मुंबईच्या बोरीवली पूर्वेत डंपरच्या चाकाखाली जाऊन 13 वर्षीय शाळेकरी मुलाच्या दुर्दैवी मृत्यू झालाय. बोरिवली पूर्वेत रोड नंबर तीन वर 13 वर्षीय शाळकरी मुलगा आपल्या बहिणीसोबत दुपारी शाळेत जात असताना भरधाव वेगाने जात असलेल्या डंपरने त्याला उडवले. मुलगा डंपरच्या चाकाखाली गेल्यामुळे मुलाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. सत्येंद्र कनोजिया वय 13 वर्ष असा शाळकरी मुलाचा नाव आहे. घटनेची माहिती मिळतात कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन मुलाचा बॉडी पोस्टमार्टमसाठी शताब्दी रुग्णालयामध्ये पाठवले आहे. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी डंपर चालकाचे विरोधात गुन्हा दाखल करू अधिक तपास करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या