Nagpur : हत्येचा शोध घेणाऱ्या पोलिसांच्या हाती पिस्तुलचे रॅकेट, दोन सप्लायर अटकेत; ऐन दिवाळीच्या तोंडावर नागपूर पोलिसांचं यश
Nagpur Illegal Arms Racket Busted : एका लॉज मालकाच्या हत्येचा शोध घेणाऱ्या पोलिसांना अवैधरित्या सुरू असलेल्या पिस्तूल विक्रीचे रॅकेट हाताला लागले आहे.
नागपूर: ऐन दिवाळीच्या तोंडावर नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police Action) मोठी कारवाई केली आहे. एका हत्येच्या प्रकरणाचा (Crime) तपास करत असताना तहसील पोलीस स्टेशनच्या पथकाच्या कारवाईमुळे नागपुरात विकल्या जाणाऱ्या पिस्तूल विक्रीचे रॅकेट (Nagpur Illegal Arms Racket Busted) पोलिसांच्या हाती लागले आहे. या प्रकरणी तब्बल 9 पिस्तूल, 1 देशी कट्टा आणि 85 जिवंत काडतुसह दोघांना अटक करण्यात आलं आहे. मोहम्मद सोहेल परवेज आणि इम्रान आलम असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
राज्याची उपराजधानी नागपुरात गेल्या काही काळापासून गुन्हेगारी फोफावत आहे. एकीकडे गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून दुसरीकडे गुन्हेगारीतील स्वरूप देखील बदलत आहे. नागपूर तहसील पोलीस स्टेशन पथकाच्या कारवाईमुळे पिस्तूल विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलीस अधिक सखोल तपासणी करत असून या कारवाईमुळे आणखी काय नवा खुलासा होतो हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हत्येच्या प्रकरणाचा तपास सुरू होता
काही दिवसांपूर्वी नागपुरातील मोमीनपूरा भागात एका गेस्ट हाऊस मालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणी तपास करताना तहसील पोलीस स्टेशनच्या पथकाने हत्येसाठी वापरलेली बंदूक कुठून आली याचा तपास सुरू केला. या तपासादरम्यान हत्येप्रकरणी मोहम्मद सोहेल परवेज आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती.
मोहम्मद सोहेल परवेजने हत्येच्या गुन्ह्यात वापरलेली बंदूक ही फिरोज खान नामक व्यक्तीकडून विकत घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर फिरोजच्या घरातून दोन पिस्तूल, एक देशी कट्टा आणि 80 काडतूस जप्त करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी शस्त्र पुरवणारा मुख्य आरोपी इम्रान आलमला अटक केली आहे.
इम्रान आलम हा मूळचा मध्यप्रदेशच्या बालाघाट येथील रहिवासी आहे. इम्रान हा फिरोज खानला शस्त्र पुरवठा करतो.त्याच्याशी संबंधित ठिकाणावरून पोलिसांनी हाती आणखी 7 पिस्तूल जप्त केले आहे. हत्येच्या गुन्ह्यात सहा आरोपी आणि अर्म्स ऍक्ट अंतर्गत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती नागपूर तहसील पोलीस स्टेशनचे पोलिस उपायुक्त गोरख भामरे यांनी दिली.
दोन वर्षापासून सुरू होता व्यवसाय
पकडण्यात आलेले आरोपींची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी असून फिरोज खान याच्यावर नागपुरात तर इम्रान आलम यावर बालाघाट येथे गुन्हे दाखल आहेत. फिरोज खान आणि इम्रान आलम हे दोन वर्षांपासून संपर्कात आहेत. या दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक पिस्तूल विक्रीचे व्यवहार केल्याचा संशय पोलिसांना आहे. अरोपींचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून त्यातून देखील नवी माहिती समोर येण्याची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही बातमी वाचा: