Nagpur Kinnar Controversy: नागपुरात कथित पीठाधीश्वर पदावरून किन्नरांमध्ये तणाव; गंभीर गुन्ह्यातील उत्तम बाबाला पीठाधीश्वराच्या गादीवर बसवण्यावरून वाद, नेमकं प्रकरण काय?
Nagpur Kinnar Community Controversy: खुनाच्या आरोपातील किन्नर उत्तम बाबा सेनापती याला पीठाधीश्वर बनवण्याच्या हालचालींमुळे शहरातील इतर किन्नराच्या दुसऱ्या गटात (Kinnar) तीव्र नाराजी पसरली आहे.

Nagpur Kinnar Community Protest News: नागपुरात किन्नरांच्या गटांमध्ये पीठाधीश्वराच्या गादीवरून तणाव निर्माण झाला आहे. खुनाच्या आरोपातील किन्नर उत्तम बाबा सेनापती याला पीठाधीश्वर बनवण्याच्या हालचालींमुळे शहरातील इतर किन्नराच्या दुसऱ्या गटात (Kinnar Community) तीव्र नाराजी पसरली आहे. पीठाधीश्वर बनवण्यासाठीच्या प्रस्तावित कार्यक्रमाची माहिती मिळताच मोठ्या संख्येने किन्नर (Kinnar) पारडी येथील एका संघटनेच्या कार्यालयाबाहेर जमा झाले होते. यावेळी त्यांनी आंदोलन करत कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. या दरम्यान मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. (Tensions between Nagpur Kinars)
Nagpur Kinnar Community: तृतीयपंथी समुदायाची कार्यक्रम रद्द करण्याची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, पीठाधीश्वर पदग्रहणाचा कार्यक्रम महामंडलेश्वर हिमांगी सखी यांच्या हस्ते होणार होता. हिमांगी सखी रामदासपेठ येथील हॉटेल तुली इम्पीरियलमध्ये थांबल्या असल्याची माहिती मिळताच काही किन्नर हॉटेलबाहेर ही जमा झाले. त्यामुळे परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दरम्यान, उत्तम बाबा हा किन्नर कायमच वादग्रस्त राहिला आहे. दहा वर्षांपूर्वी संपूर्ण शहरात त्याचा दबदबा होता. पैशांच्या वाटणीच्या वादातून उत्तम बाबाने 2019 मध्ये स्वतःच्या सहकारी चमचम गजभियेची हत्या केल्याचा आरोप आहे. सात वर्षांनंतर त्याला जामीन मिळाला असून काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला आहे.
उत्तम बाबा संदर्भात तृतीयपंथी समुदायाच्या सदस्यांमध्ये प्रचंड रोष (Tensions between Nagpur Kinars)
नागपूर शहरात किन्नरांचे चार मोठे डेरे असून बहुतांशी किन्नर उत्तम बाबाविरोधात नाराज आहे. अशातच या वादामुळे झालेल्या आंदोलन करणाऱ्या किन्नरांची पोलिसांनी समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, मोठ्या संख्येने किन्नरांचा उत्तम बाबा संदर्भात रोष पाहून पिठाधीश्वर जाहीर करण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. दुसऱ्या बाजूला विश्व हिंदू परिषदेने उत्तम बाबा याला पिठाधीश्वर जाहीर करण्याच्या कुठल्याही कार्यक्रमाची आमचा कोणताही संबंध नाही, हे स्पष्ट केले आहे. दरम्यान पारडीतील ज्या कार्यालयासमोर किन्नरांनी आंदोलन केले, तो कार्यालय ही विश्व हिंदू परिषदेची संबंधित नसल्याचे विहीपने स्पष्ट केले आहे.
Kinnar Community : खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला उच्च धार्मिक आणि सामाजिक स्थान देणे चुकीचे
तृतीयपंथी समुदायाच्या सदस्यांचे म्हणणे आहे की, खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला इतके उच्च धार्मिक आणि सामाजिक स्थान देणे चुकीचे आहे. याच कारणामुळे चारही प्रमुख तृतीयपंथी डेरांनी (एकांतवासी गटांनी) या निर्णयाला विरोध केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये चार प्रमुख तृतीयपंथी डेरे असून, ते सर्व उत्तम बाबांवर नाराज आहेत. वास्तविक पाहता, उत्तम बाबांचे नाव यापूर्वीही अनेक वादांमध्ये अडकले आहे. एक काळ असा होता की संपूर्ण शहरात त्यांचे वर्चस्व मानले जात होते. असे म्हटले जाते की, सुमारे 10 वर्षांपूर्वी तृतीयपंथी समाजात त्यांचा मोठा प्रभाव होता. तथापि, नंतर पैसे आणि वाट्याच्या विभागणीवरून वाद वाढले. तृतीयपंथी समुदायातील अनेक सदस्यांचे असे मत आहे की, समुदायाची प्रतिमा पाहता अशा व्यक्तीला धार्मिक स्थान देऊ नये. या मुद्द्यावरून होणारी आंदोलने सातत्याने तीव्र झाली आहेत.






















