Solapur Crime : मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
Solapur Crime News : भोंदू मनोहर भोसलेनंतर सोलापूर जिल्ह्यात आणखी एका भोंदू बाबाला टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर फसवणूक जादूटोणा अशा पद्धतीचे आरोप आहेत.

Solapur Crime News : भविष्य बदलवण्याचे आमिष दाखवत भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा (Manohar Mama Bhosale) याला सोलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सध्या भोंदू बाबा मनोहर भोसले पोलिसांच्या ताब्यात असून दिवसागणिक त्याच्या अडचणीत वाढ होत आहे. अशातच भोंदू मनोहर भोसलेनंतर सोलापूर जिल्ह्यात आणखी एका भोंदू बाबाला (Solapur Bhondubaba) टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर फसवणूक (Crime) जादूटोणा अशा पद्धतीचे आरोप आहेत. माढा तालुक्यातील आडेगाव येथे नाना महाराज उर्फ गुरु माऊली विरकर यांनी भोंदूगिरी (Bhondubaba) करून आपले चांगलेच बस्तान बसविले होते. मोठमोठे राजकीय नेते देखील या भोंदूच्या भजनी लागलेली होते. अनेक राजकीय नेत्यांचा याच्याकडे राबता असल्याने जादूटोणा भविष्य सांगणे आणि अशाच पद्धतीने लोकांची फसवणूक (Crime News) करण्याचे काम हा वीरकर महाराज बिनबोभाटपणे करीत होता. अशातच फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यावर वीरकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आज पहाटेच साखर झोपेत असताना टेंभुर्णी पोलिसांनी गुरुमाऊली वीरकर आणि त्याचा मोठा भाऊ विकास विरकर यांना आडेगाव येथील आश्रमातून ताब्यात घेतले आहे.
Solapur Crime : माझ्याकडील कासव घे, पैशाचा पाऊस पडतो म्हणत फसवणूक, गुरुमाऊली वीरकर आणि मोठ्या भावाला अटक
पंढरपूर तालुक्यातील एका पीडितेला 2024 पासून व्यवहारात भरपूर पैसे मिळवून देतो, माझ्याकडील कासव घे, पैशाचा पाऊस पडतो. अशा पद्धतीची फसवणूक या वीरकर महाराजांनी केली होती. यातील पीडित तरुणाचा व्यवसाय तर वाढला नाहीच, मात्र कर्जाचा डोंगर वाढत गेला. आत्तापर्यंत जवळपास पाच लाखापेक्षा जास्त रुपयाची फसवणूक झाल्याचा दावा या पीडितीने केला असून आज पहाटे टेंभुर्णी येथे दोन लाख 35 हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यावर वीरकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पहाटेच साखर झोपेत असताना टेंभुर्णी पोलिसांनी गुरुमाऊली वीरकर आणि त्याचा मोठा भाऊ विकास विरकर यांना आडेगाव येथील आश्रमातून ताब्यात घेतले आहे. या भोंदू बाबांनी ज्यांची ज्यांची फसवणूक केली आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.
Manohar Mama Bhosale : मनोहर भोसलेच्या अडचणी वाढणार; आश्रमात वीज चोरी प्रकरणी आश्रमाची वीज तोडली
भोंदू बाबा मनोहर भोसलेचे रोज नवनवीन प्रताप समोर येऊ लागले असून आता त्याचा घोटी येथील आश्रमात वीज चोरीचे प्रकरण समोर आले आहे. ज्या आश्रमात अमावस्या आणि पौर्णिमेला हजारो भक्तांची उपस्थिती असायची तेथील वीजच या भोंदू बाबाने चोरून वापरत असल्याचे समोर आले आहे. यानंतर वीज वितरण कंपनीने कृती आश्रमातील घरगुती वापराची वीज तुटली असून जवळपास 28 लाखाचे दंडाचे बिल मनोहर भोसले याला देण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीने आता कठोर कारवाईसाठी पोलिसात देखील तक्रार करण्याची सुरुवात केली असून आधीच जादूटोणा, भोंदूगिरी आणि फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल असलेल्या मनोहर भोसलेच्या अडचणी अजून वाढणार आहेत. मनोहर भोसले याने जून 23 पासून करमाळा तालुक्यातील घोटी या त्याच्या आलिशान आश्रमात वीज चोरी केल्याचे समोर आले होते. यानंतर वीज वितरण कंपनीने तातडीने त्याच्या आश्रमाचा वीस पुरवठा खंडित करून त्याच्यावर दंडाच्या कारवाईला सुरुवात केली होती. आता या वीज चोरी प्रकरणी बाबा मनोहर भोसले याच्यावर अजून एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Crime Patrol Style Theft Special Report : 'क्राईम पेट्रोल' पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या






















