एक्स्प्लोर

Pune Crime News : अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना

Pune Shocking Crime : कौटुंबिक वादातून अवघ्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्यासोबत क्रूर कृत्य करण्यात आलं असून या प्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : पुण्यातील लोहगाव परिसरातून मानवतेला काळिमा फासणारी आणि अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादाचा राग मनात धरून एका महिलेने अवघ्या 9 महिन्यांच्या निष्पाप बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतल्याचा अमानुष प्रकार घडला आहे. याप्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात एका महिलेसह एकूण तिघांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमी बाळावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

ही भयानक घटना 31 जुलै रोजी पुण्यातील लोहगाव परिसरातील कलवड वस्ती भागात घडली असून, याप्रकरणी अल्ताफ नबी शेख यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Pune Baby Fevikwik : कौटुंबिक वादातून चिमुकल्यासोबत क्रूरता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्ताफ शेख यांची पत्नी जैनाब आणि तिची भावजय आरोपी सानिया शेख यांच्यात काही कौटुंबिक कारणांवरून सतत वाद सुरू होते. हाच वादाचा राग मनात धरून आरोपी सानिया शेख हिने घरात शांत झोपलेल्या अवघ्या 9 महिन्यांच्या निष्पाप बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Pune Crime News : तक्रार केल्यास जीवे मारण्याची दिली धमकी

या धक्कादायक घटनेनंतर आरोपी सानिया हिने या प्रकाराबाबत कोणालाही माहिती दिली किंवा पोलिसांत फिर्याद दिली तर जीवे मारण्याची थेट धमकी दिली. तसेच, इतर दोन आरोपींनीदेखील फिर्यादी अल्ताफ शेख यांना सानियाविरोधात पोलीस तक्रार केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा धाक दाखवल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

Baby Hospitalized : बाळावर रुग्णालयात उपचार सुरू; प्रकृती स्थिर

घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने बाळाच्या आईने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने डॉक्टरांच्या वेळेवर उपचारांमुळे बाळाचा जीव वाचला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. बाळाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Police Action : लोहगाव पोलिसांकडून तिघांवर गुन्हा दाखल

बाळाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून लोहगाव पोलिसांनी मुख्य आरोपी सानिया शेख हिच्यासह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई लोहगाव पोलीस करत आहेत.

ही बातमी वाचा:

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
Thane : तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? पोलिसांचा मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांना प्रश्न; मनसेचे अविनाश जाधव संतापले
तुमच्या मुलाला खड्डा दिसला नाही का? पोलिसांचा मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांना प्रश्न; मनसेचे अविनाश जाधव संतापले
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
Embed widget