(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime News : लग्नाचे आमिष दाखवून ऑफिसमधील तरुणीचे लैंगिक शोषण; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
Nagpur Crime News: सोबत काम करणाऱ्या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र लग्नाची विचारणा केल्यानंतर पळ काढत फसवणूक करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
Nagpur News नागपूर : ऑफिसमध्ये सोबत काम करणाऱ्या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित (Nagpur Crime News) केले. मात्र नंतर पुण्यात चांगली नोकरी लागल्यानंतर प्रेयसीला वाऱ्यावर सोडणाऱ्या एका प्रियकराविरुद्ध मानकापूर पोलिसांनी (Nagpur Police) गुन्हा दाखल केला आहे. नमन विनोद संगोत्रा (22, रा. द्विवेदी कॉलनी, गोरेवाडा रोड, गिट्टीखदान) असे या संशयित आरोपी प्रियकराचे नाव आहे. पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे.
जवळीक साधत केली फसवणूक
या प्रकरणातील संशयित आरोपी नमन आणि जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी 22 वर्षीय युवती हे एकाच ठिकाणी काम करत होते. दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे त्यांची अधिक जवळीक वाढली. पीडित तरुणीच्या आईवडिलांचे निधन झाल्यामुळे ती आपल्या मावशीकडे राहत होती. युवती आणि नमन हे मिहान परिसरातील एका खासगी कंपनीत सोबत काम करायचे. त्यासाठी ते दररोज एकाच बसमध्ये ये-जा करीत असल्यामुळे त्यांच्या कायम एकमेकांशी संपर्क होता. याच संधीचा फायदा घेत नमनने अधिक जवळीक साधत तरुणीला अनेक आश्वासन दिले. त्यानंतर नमनने युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान नमनने अनेकदा युवतीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
लग्नाबाबत विचारणा केली असता काढला पळ
दरम्यान, नमनला युवतीने लग्नाबाबत विचारणा केली असता तो कायम उडवा-उडावीचे उत्तर देत असे. मात्र अलीकडे युवतीने नमनकडे लग्नासाठी तगादा लावला होता. काही दिवसांनंतर नमनला पुण्याच्या एका कंपनीत चांगली नोकरी लागल्याने तो पुण्याला निघून गेला. पुण्यातही त्याने युवतीला बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, युवतीच्या मावशीने युवतीच्या लग्नासाठी स्थळ पाहण्यास सुरुवात केली असतांना युवतीने पुन्हा नमनला लग्नाबाबत विचारणा केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता यावेळी नमनने लग्नास नकार देऊन दिला. हे समजताच तरुणीला जबर धक्का बसला.
आपली फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर या बाबत नमनला जाब विचारला असता दोघांमध्ये वाद झाला. या वादात नमनने तरुणीला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच या बाबत बाहेर कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर तरुणीने हिम्मत करत सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आणि नमन विरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी नयन विरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या