एक्स्प्लोर

Nagpur Crime : प्रेमविवाहाने सुरू झालेल्या संसाराचा दुर्देवी अंत, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला संपवलं

Nagpur Crime : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीचीची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी या जोडप्याचा प्रेमविवाह झाला होता.

Nagpur Crime :  नागपूरच्या कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीचीची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी या जोडप्याचा प्रेमविवाह झाला होता.  मन्नत कौर विर्क असे मृत पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दिलप्रीत सिंग विर्क याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

आरोपी दिलप्रीत विर्क आणि मृत मन्नत कौर यांचा 2022 मध्ये प्रेमविवाह झाला होता. मात्र मागील काही दिवसापासून दोघांमध्ये सतत खटके उडत होते. त्यातच मंगळवारी 25 जूनच्या रात्री हा वाद एवढा विकोपाला गेला होता. या वादातून संतापाच्या भरात आरोपी दिलप्रीत सिंगने पत्नी मन्नतवर लोखंडी रॉडने  वार करून तिला ठार केले. 

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. विशेष म्हणजे हत्येच्या एक दिवसापूर्वीच मन्नत विर्क हिने आपल्या भावासह पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत मनप्रीत विरोधात तक्रार दाखल केली होती. आपल्या जीवाला पती दिलप्रीत पासून धोका असल्याची तक्रार मन्नतने दिली होती. मात्र पोलिसांनी वेळेत कारवाई केली नाही आणि दुसऱ्याच दिवशी मन्नत विर्कची हत्या झाली. 

घरात कुणीही नसताना प्रियकराने महिलेला संपवलं, विरारमधील घटना

विरारमध्ये एका खळबळजनक हत्येची (Crime News) घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे. पालघर जिल्ह्यातील विरार येथील यात एका विवाहित महिलेची साडीने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मध्यरात्री विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकाराविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. दोघांमधील किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येपर्यंत गेल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली.

धनश्री आंबडस्कर (वय 32 वर्ष) ही महिला रुपेश आंबडस्कर (वय 37 वर्ष ) तसेच नेत्रा आणि नव्या या दोन लहान मुलींसह विरार पश्चिमेच्या फुलपाडा येथील साईनाथ अपार्टमेंटमध्ये राहत होती. सोमवारी सकाळी तिचा पती रूपेश कामावर गेला होता. तसेच दोन मुली शाळेत गेल्या होत्या. दरम्यान दुपारच्या सुमारास या प्रकरणातील संशयित आरोपी शेखर कदम हा  धनश्रीच्या घरी आला होता.  त्यावेळी दोघामध्ये भांडण झालं आणि संशयित आरोपीने धनश्रीचा साडीने गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने धनश्रीची तब्येत बिघडल्याचा बनाव  रचून तिला जवळचा रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला तेथे मृत घोषित केलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12 AM : 30 June : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report : कसायला जमीन, पण गुंडांचे अतिक्रमण! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचे अतोनात हाल!India Won T20 World Cup : एका कॅचने फिरवली मॅच..17 वर्षांनी भारत विश्वविजेता! ABP MajhaIndia Won T20 world cup : भारताने अखेरच्या षटकात जिंकला T20 वर्ल्डकप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
Majha Katta : मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
IND vs SA T20 World Cup Final : केशव महाराजची घातक ओव्हर, रोहित शर्मा अन् रिषभ पंतची  विकेट काढली, भारताला मोठे धक्के
केशव महाराजनं जाळं टाकलं, रोहित शर्मा-रिषभ पंत फसले, भारताला सुरुवातीला दोन धक्के
Embed widget