Nagpur News: चक्क ट्रकमध्ये वेगळा कप्पा करून गांजाची तस्करी; पोलिसांनी सापळा रचत केली मोठी कारवाई
Nagpur Crime News: ट्रकच्या कंटेनर मध्ये वेगळा कप्पा करून त्यामध्ये छुप्या पद्धतीने अवैध गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपींच्या टोळीचा नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.
Nagpur Crime News: ट्रकच्या कंटेनर मध्ये वेगळा कप्पा करून त्यामध्ये छुप्या पद्धतीने अवैध गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपींच्या टोळीचा नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. ज्यामध्ये एका ट्रकमध्ये वेगळा कप्पा तयार करून तब्बल 500 किलो गांजा लपवुन नेला जात होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील बुटीबोरी येथे सापळा रचत ही कारवाई केली. ज्यामध्ये दोन आरोपीसह तब्बल 69,76000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शब्बीर खान आणि मुनव्वर खान अशा अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे असून इतर दोन आरोपी फरार झाले आहे. त्या फरार आरोपींचा देखील शोध सध्या पोलीस घेत आहे.
चक्क ट्रकमध्ये वेगळा कप्पा करून गांजाची तस्करी
राज्यात प्रतिबंधित अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांच्या वतीने कडक धोरण राबविण्यात येत आहे. असे असले तरी कुठल्या ना कुठल्या छुप्या मार्गाने या अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी नवनवीन शक्कल हे तस्कर लावत असतात. अशाच एका टोळीचा नागपूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहे. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुरुवार, 11 जानेवारीच्या रात्री पेट्रोलिंगवर असतांना एक गुप्त माहिती प्राप्त झाली. ज्यामध्ये एका ट्रकच्या माध्यमातून छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बुटीबोरीतील वाय पॉईंट जवळ सापळा रचत या ट्रकची अडवणूक केली. त्यानंतर या ट्रकमधील व्यक्तींची विचारपुस करत ट्रकची झडती घेतली असता, या ट्रकच्या कंटेनरला आत वेगळा कप्पा आढळून आला. त्यामध्ये प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये काहीतरी लपून ठवलेले दिसून आले. त्यानंतर अधिक तपास केला असता या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.
विशाखापट्टणम वरुन बिहारकडे नेला जात होता गांजा
या धडक कारवाई मध्ये छुप्या पद्धतीने अवैध गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपींना घटनास्थळांवरून पळ काढण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेला गांजाचा माल हा विशाखापट्टणम येथून आणलेला होता आणि बिहार येथे नेला जात होता. राजस्थान येथील शब्बीर जुममे खान (वय-30) आणि हरियाणा येथील मूनवर आझाद खान (वय 28) असे पकडण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे असून गाडी मालक हाफिज जुमे खान आणि इतर एक आरोपी फरार झाले आहे. त्यांचा शोध पोलीस घेत आहे.
दोन आरोपींसह मुद्देमाल जप्त
या कारवाई मध्ये तब्बल 49,56,000 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. तर या गुन्हात वापरलेली गाडी क्रमांक HR 55-S-2346 हा ट्रक ज्याची किंमत 20 लाख, आणि 20 हजार किंमतीचे 2 मोबाइल असा एकूण 69,76000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईतील आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे बुरीबोरी येथे अप क्र /2024 कलम 20, 22 एन.डी.पी.एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलीस करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: