(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime : डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात पतीच्या हत्याप्रकरणी बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल; पिस्तूलसह अवैध सावकारीची कागदपत्रे जप्त
पत्नीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातच पतीची हत्या करणाऱ्या बापलेक शेरू राठोड आणि त्याचा मुलगा रितीक यांच्याविरोधात पोलिसांनी विनयभंग, खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.
Nagpur Crime News : पत्नीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातच पतीची हत्या (Murder) करणारे बापलेक शंकर ऊर्फ शेरु राठोड आणि त्याचा मुलगा रितीक यांच्याविरोधात इमामवाडा पोलिसांनी (Nagpur Police) गुन्हा दाखल केला आहे. विनयभंग, खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत पोलिसांनी (Nagpur News)ही कारवाई केली आहे. सोबतच या प्रकरणातील संशयित आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या राहुल सहदेव नेवारे 25 वर्ष आणि अमोल हिम्मतराव वानखेडे 37 वर्ष यांना देखील अटक करण्यात आलीये. पोलिसांनी संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची पुढील तपासणी पोलीस गांभीर्याने करत आहे.
पत्नीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात पतीच्या हत्येचा थरार
उपराजधानी नागपूरात हत्यांची मालिका सुरू असल्याचे चित्र आहे. सध्या सुरू असलेल्या फेब्रुवारी महिन्याच्या 21 दिवसांत 15 हत्येच्या घटना घडल्याने फेब्रुवारी महिन्यात घडल्या आहेत. नागपूरच्या इमामवाडा परिसरात बुधवार, 21 फेब्रुवारीच्या रात्री साडेअकरा वाजता, जातरोडी येथे अशीच एक घटना घडली. यात किरकोळ वादातून बापलेकांनी शेजारी राहणाऱ्या युवकावर चाकून हल्ला केला. या हल्ल्यात या तरुणाचा मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे मृताच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातच त्याची हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. महेश विठ्ठल बावणे 23 वर्ष असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. तर शेरूदादा ऊर्फ शंकर भोलासिंग राठोड वय 52 वर्ष आणि रितिक शंकर बावणे 21 वर्ष अशी संशयित आरोपी बापलेकांची मिळून ही हत्या केली होती.
शेरूकडे आढळले पिस्तूलसह अवैध सावकारीची कागदपत्रे
नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने संशयित आरोपी शेरूला नंदनवन येथून अटक केली. पण त्याचा मुलगा फरार होता. शेरु हा सराईत गुन्हेगार असून तो वस्तीत व्याजाने पैसे देण्याचे काम करायचा. सोबतच इतर अनेक अवैध धंद्यात देखील तो सक्रीय असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणाचा तपास करतांना पोलीस उपायुक्त नीमित गोयल आणि गोरख भामरे यांच्या पथकाने शेरू राठोडच्या घराची झडती घेतली असता, तेथे अवैध सावकारीशी निगडित कागदपत्रे सापडली. सोबतच एक पिस्तूलदेखील आढळले. त्यानुसार, शेरुवर सावकारी अधिनियम आणि शस्त्र कायद्यानुसारदेखील कारवाई करण्यात आली आहे. सोबतच या प्रकरणातील संशयित आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या राहुल सहदेव नेवारे आणि अमोल हिम्मतराव वानखेडे यांना देखील अटक केली असून त्यांची देखील चौकशी केल्या जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या