एक्स्प्लोर

Nagpur News:घरात खेळताना चाके असलेल्या खुर्चीवरून तोल गेला अन् गळ्याला....; आई वडील घरी नसताना चिमुकल्यासोबत आक्रीत घडलं, नागपुरात 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत

Nagpur Accident News : नागपूर शहरातून एक अतिशय खळबळजनक घटना समोर आली आहे. यात खेळताना अनवधानानं गळफास लागून एका 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Nagpur News) झाला आहे.

Nagpur Accident News : नागपूर शहरातून एक अतिशय खळबळजनक घटना समोर आली आहे. यात खेळताना अनवधानानं गळफास लागून एका 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Nagpur News) झाला आहे. प्रतापनगर हद्दीतील शेवाळकर अपार्टमेंटमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मल्हार अनमोल रंगारी (वय 11) अस या मृतक मुलांचं नाव आहे. घरात खेळत असताना खिडकीला बांधलेला पट्टा गळ्यात टाकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Nagpur News: आई वडील घरी नसताना चिमुकल्यासोबत आक्रीत घडलं

मिळालेल्या माहितीनुसार, चाके असलेल्या खुर्चीवर उभा असताना तोल गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर खुर्ची सरकल्याने गळ्यातील पट्टा आवळला गेल्याने हि घटना घडली असावी असा अंदाज आहे. घटनेवेळी आई-वडील नोकरीवर असल्याने मुलगा घरात एकटाच होता. त्यावेळी हि घटना घडलीय. तर हि घटना अपघाती स्वरूपाची असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून प्रतापनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र घरातील मुलांच्या सुरक्षेबाबत पालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज या निमित्याने अधोरेखित केली जात आहे.

Nagpur Crime News: तीन देशी पिस्तूल, जिवंत काडतुस आणि तलवारसह शस्त्रसाठा जप्त आरोपील बेड्या

नागपूर पोलिसांनी दाभा परिसरात धाड टाकून तीन देशी पिस्तूल, जिवंत काडतुस आणि तलवार असा शस्त्रसाठा जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अब्बास सय्यद खान आणि ऋत्विक नाईक या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी अब्बास हा दाभा रिंग रोडवरील एका कॅफेमध्ये देशी पिस्तुलासह थांबला असून गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकून अब्बासला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून एक देशी पिस्तूलसह जिवंत काडतुस आणि तलवार, चाकू जप्त करण्यात आली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्बास हा सराईत गुन्हेगार असून 2022 मधील वाडी हत्याकांड प्रकरणात त्याचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्याच्यावर मकोका अंतर्गतहि कारवाई करण्यात आली होती. परिणामी सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या  

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला, हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या गाडीचा पाठलाग करत तोडफोड, 10 जणांविरोधात गुन्हा
Solapur Crime News: 'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
'तुझ्या आमदाराला गोळ्या घालून ठार कर, तुला पैसे देतो'; आमदाराच्या वाहन चालकाला आमिष दाखवलं अन्...; सोलापुरातील खळबळजनक घटना
Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
Embed widget