एक्स्प्लोर

Mumbai Rape Case LIVE UPDATE : मुंबई साकिनाका सामूहिक बलात्काराची घटना क्लेशदायक : छगन भुजबळ

Mumbai Rape Case : मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Key Events
Mumbai Saki Naka Rape Case Update Woman Raped And Tortured With An Iron Rod Dies In Hospital live update Mumbai Rape Case LIVE UPDATE : मुंबई साकिनाका सामूहिक बलात्काराची घटना क्लेशदायक : छगन भुजबळ
live_blog_(6)

Background

Mumbai Rape Case : मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की, राजावाडी हॉस्पिटलमध्ये पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली होती. पीडित महिलेवर आधी टेम्पोमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. 

या प्रकरणी आरोपीला घटनेच्या काही तासांच्या आत अटक करण्यात आलं आहे. पोलिसांनी सांगितलं होतं की, शुक्रवारी पहाटे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला की खैराणी रोडवर एक पुरुष एका महिलेला अमानुषपणे मारहाण करत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळी रक्ताने माखलेल्या महिलेला महानगरपालिका प्रशासित राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले होते.

मुंबईत निर्भयाची पुनरावृत्ती.. 32 वर्षीय महिलेवर टेम्पोमध्ये बलात्कार, अत्याचारानंतर अमानुषपणे मारहाण

आम्हाला माफ कर ताई - चित्रा वाघ

पीडितेच्या मृत्यूचं वृत्त कळल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे की, साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही. 
पण या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणं देणं नाही. त्यांच्यासाठी तुझा मृत्यू म्हणजे फक्त अजून 1 नंबर. लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेताना. नाही वाचवू शकलो तुला, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काल म्हटलं होतं की, एका आरोपीला आता अटक केली आहे. पण मला खात्री आहे की यात आणखी नावं समोर येतील. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिलांची बोटं छाटली जात आहेत, कुठं एफआयआर नोंदवली जात नाही. गणरायानं या सरकारला सद्बुद्धी द्यावी, महिला आणि मुलींवरील अत्याचारावर फक्त भाषणं करण्याऐवजी त्यावरील कायद्यांची प्रभावी अमलबजावणी व्हावी, असं वाघ म्हणाल्या.

कठोरात कठोर शिक्षा केली जाईल गृहमंत्री : दिलीप वळसे पाटील

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होते की, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा केली जाईलच, पण त्यापुढे जाऊन यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा ही तपास करण्याच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. तसा अहवाल वेळोवेळी पोलीस सादर करतील, असं वळसे पाटील म्हणाले.

दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी- देवेंद्र फडणवीस

या घटनेवर संताप व्यक्त करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतील साकीनाका भागात निर्भयासारखी घटना ऐकून मन सुन्न झाले. कलम 144 फक्त गणेशभक्तांसाठीच का? असा सवाल त्यांनी केला आहे. वाढते महिला अत्याचार थांबविण्यासाठी कोणते कलम आणि केव्हा लावणार? असा सवाल करत दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. 

शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे म्हणाल्या होत्या की, पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ती बेशुद्ध आहे. एक शस्त्रक्रिया झाली आहे. मध्यरात्री हा प्रकार झाला आहे. या प्रकरणी आरोपी देखील पकडला गेला आहे. हे क्लेषदायक आहे, संतापजनक आहे. वाईटातली वाईट शिक्षा त्या आरोपीला मिळाली पाहिजे. त्या महिलेला त्वरित मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू असं कायंदे म्हणाल्या.

आरोपीला भादंविच्या कलम 307, 376 अंतर्गत अटक करण्यात आली
काही पुराव्यांच्या आधारे आरोपीला भादंविच्या कलम 307 (खुनाचा प्रयत्न) आणि 376 (बलात्कार) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. घटनेसंबंधी पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

15:50 PM (IST)  •  11 Sep 2021

मुंबई साकिनाका सामूहिक बलात्काराची घटना क्लेशदायक : छगन भुजबळ

मुंबई साकिनाका सामूहिक बलात्काराची घटना क्लेशदायक आहे. या घटनेतील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे ऐकून धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्यात महिलांबाबत कठोर कायदे तरी अश्या घटना घडतात. सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार. प्रसंगी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या सारख्या वकिलांची नियुक्ती करून आरोपींना कठोर शासन करू अशी ग्वाही राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदार संघात झालेल्या अतिवृष्टीमुळे  नुकसान पाहणी दौऱ्यासाठी भुजबळ आले असता नुकसानग्रस्तांना कोकण, सांगली, कोल्हापूरप्रमाणेच मदत दिली जाणार असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले.

14:33 PM (IST)  •  11 Sep 2021

साकीनाका घटना निंदनीय, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

 
मुंबई :  साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो  आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ICC T20 World Cup: बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??

व्हिडीओ

Ajit Pawar Baramati : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरुन प्रश्न, अजितदादा म्हणाले, बघू आता...
Madhuri Misal On Mayor Reservation : ठाकरे गटाचा आक्षेप नियमाला धरुन नाही, मिसाळ यांची प्रतिक्रिया
Thane Mayor Reservation : ठाण्यात शिवसेनेचा महापौर होईल- म्हस्के, शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास
Sunil Kedar Nashik : नाशिकमध्ये नवा चेहरा, महापौर भाजपचा होणार, सुनील केदार यांचे संकेत
KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ICC T20 World Cup: बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Shivsena : मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
BMC Election 2026 : एमआयएमनं मुंबई महापालिकेत 8 जागांवर मुसंडी मारली, गटनेतेपदी कोणाची निवड? ओवेसी ट्वीट करत म्हणाले...
एमआयएमनं मुंबई महापालिकेत 8 जागांवर मुसंडी मारली, गटनेतेपदी कोणाची निवड? ओवेसी ट्वीट करत म्हणाले...
Nashik Mayor: बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Embed widget