एक्स्प्लोर

भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर! एक वर्षाच्या चिमुरडीची सोलापुरातून सुटका, दोन महिला अटकेत

Mumbai Police : भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर करण्यासाठी बाळांची चोरी होत असल्याचं समोर आलंय.

Mumbai Police : मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सोलापूर येथून दोन महिलांना अटक केली आहे. पोलिसांनी अपहरण झालेल्या एक वर्ष एक महिन्याच्या एका चिमुरडीची सुटका केली आहे. भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर करण्यासाठी बाळांची चोरी होत असल्याचं समोर आलंय. गेल्या आठवड्यात सांताक्रूझ येथून एका चिमुरडीचे अपहरण करण्यात आले होते आणि त्याबाबत सांताक्रूझ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका आठवड्यातली दुसरी घटना आहे. मुस्कान शेख ही तक्रारदार आहे तिने तक्रार दिली होती. ती फुटपाथवर वास्तव्यास असते आणि तिची 1 वर्षाची मुलगी गायब झाली होती. मुलगी हरवल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. 30 ऑक्टोबरची घटना आणि 31 ऑक्टोबरला अपहरणचा गुन्हा दाखल झाला होता. 

मुलं शोधण्यासाठी टीम तयार करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पथकासह स्थानिक पोलीस सीसीटीव्ही फुटेजचा मदतीने पीडित मुलीचा शोध घेत आरोपीचा शोध लावला.  सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी सांताक्रूझ रेल्वे स्टेशनवर जाऊन नालासोपारा येथे गेल्याचे पोलिसांना आढळले.  मध्येच पोलिसांनी तिच्या फोटोवरून तिची चौकशी सुरू केली.  आणि ती नेहरू नगरमध्ये राहते असे समजले.  पोलिस तिच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी ती ट्रेनमध्ये बसली आणि तेलंगणाला निघून गेली. गुन्हे शाखेचे पथक तेलंगणला जाण्यासाठी निघाले असता आरोपी ट्रेनमध्ये चढून सोलापूरला येत असल्याचे त्यांना आढळले.  त्यानुसार गुन्हे शाखेने आरोपीचे छायाचित्र आरपीएफ कर्मचाऱ्यांसोबत शेअर केले आणि दोघांना सोलापूर येथे अटक करण्यात आले आणि नंतर गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी तपास करत काळ त्या मुलीला रेस्क्यू केलं. शरिफा शेख आणि सुजाता पासवान अशी दोन्ही अटक आरोपींची नावे आहेत. 

मुलीचे नाव फातिमा आणि तीला आज त्याचा पालकांचा ताब्यात देण्यात आले. तपासात अस दिसून येतंय की हे मुलं विकण्यासाठी नाही तर भीक मागण्यासाठी वापरण्यात येणार होतं, असे दिसून येतंय त्या अनुषंगाने आम्ही आता चौकशी करत आहोत.  गेल्या 15 दिवसात ही तिसऱ्या चिमकल्याची सुटका पोलिसांनी केली आहे, असे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितलं.  

दिनांक 15 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत मुंबई शहरामध्ये राबविण्यात आलेल्या "ऑपरेशन रि-युनाईट" मध्ये एकूण 480 बालके मिळून आले आहेत. मुंबई शहरामधून हरविलेल्या व अपहरण झालेल्या 18 वर्षाखालील मुले व मुली यांचा शोध व तपास करण्यासाठी मुंबई शहरामध्ये 'ऑपरेशन रि-युनाईट" चे आयोजन करण्यात आलेले होते.  सदर कालावधीमध्ये मुंबई शहरातून 18 वर्षाखालील हरविलेली जास्तीत जास्त बालके मिळून येणासाठी पोलीस ठाणे स्तरावर जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आले.  सदर मोहिम यशस्वी होण्यासाठी मुंबई मधील नागरिकांची,पोलीस व बालकांसंदर्भात करणा-या विविध शासकीय व अशासकीय संस्था यांची मदत घेण्यात आली.


रेकॉर्ड वरील मिळून आलेली बालके: 
मुले : 68
मुली : 135

रेकॉर्डवर नसलेली परंतू मिळून आलेली बालके: 
मुले: 154
मुली : 122

मिळून आलेले बाल कामगार: 
एकूण: 480 
मुले - 230
मुली - 257

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
Nandurbar Crime News: नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Embed widget