बनावट अॅपच्या माध्यमातून हॉटेल व्यावसायिकांना फसवणूक करणारे बंटी बबली अटकेत
गुगल पे चे बनावट ॲप बनवून हे जोडपं वसई-विरार परिसरातील अनेक रेस्टॉरंटमध्ये तसेच पेट्रोल पंपावर जाऊन व्यवहार करायचे. खरेदी झाल्यानंतर पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी या बनावट ॲपचा उपयोग करत होते.
वसई : बनावट ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या बंटी आणि बबलीला वसई पोलिसांनी अटक केली आहे. गुगल पे चे बनावट ॲप बनवून हे जोडपं वसई-विरार परिसरातील अनेक रेस्टॉरंटमध्ये तसेच पेट्रोल पंपावर जाऊन व्यवहार करायचे. खरेदी झाल्यानंतर पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी या बनावट ॲपचा उपयोग करत होते. समोर हॉटेल मालकाला पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेज ही हे दाखवत होते. माञ अखेर हॉटेलच्या सीसीटीव्हीच्या मदतीने यांची रवानगी तुरुंगात झाली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या या जोडप्यांनी वसईतील हॉटेल व्यावसायिक आणि पेट्रोल पंपवाल्यांची झोपच उडवली होती. आदर्श रॉय आणि करीना सोलंकी असे या दोघा बंटी बबलीची नावे आहेत. हे दोघे हॉटेलमध्ये जायचे चांगलं पाच सहा हजाराच बिल करायाचे आणि बनावट अॅपद्वारे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे. हे आपल्या मोबाईलमध्ये पैस ट्रान्सफर झाल्याचा बनावट मेसेज ही दाखवायचे. तरुणी असल्यामुळे हॉटेल व्यावसायिक विश्वासही ठेवायचे. मात्र हॉटेल मालकाच्या अकाऊंटमध्ये पैसे जमाच होतं नव्हते. अशा अनेक तक्रारी हॉटेल मालकांनी आणि पेट्रोलपंप मालकांनी पोलीस स्टेशनला केल्या होत्या. अखेर वसई पोलिसांनी एका आधार कार्डच्या माध्यमातून या दोघांना अटक केली आहे. यांनी वसई विरार परिसरातील अनेक हॉटेल मालकांना आणि पेट्रोलपंप मालकांना गंडा घातला आहे.
वसई पोलिसांनी यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पोलिसांनी यांच्या ताब्यातून एक मोबाईल देखील जप्त केलेला आहे. आता मोबाईल मधील डेटाच्या आधारे कशा प्रकारे त्यांनी लोकांची फसवणूक केली. यांचे आणखी कुणी साथीदार आहेत याचा तपास पोलीस लावणार आहेत.