एक्स्प्लोर

Mumbai Hostage Case : दीड तासांचा थरार! मुंबईतील आर. ए. स्टुडिओमध्ये नेमकं काय घडलं?, ओलीस धरलेल्या त्या मुलीने सगळंच सांगितल

Mumbai Hostage Case : रोहित आर्याने कशाप्रकारे मुलांना कोंडून ठेवलं , पोलिसांनी कसं मुलांना वाचवलं, या सगळ्याची माहिती कोल्हापूरहुन ऑडिशनला आलेल्या नारायणी जाधव या मुलीने एबीपी माझाला दिली आहे.

Rohit Arya Dies Mumbai Hostage Case : मुंबईतील पवई परिसरात आर. ए. स्टुडिओमध्ये 20 मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी रोहित आर्या पोलिस चकमकीत ठार झाला आहे. सर्व मुले सुरक्षितपणे वाचवण्यात आली आहेत. पोलिसांनी मुलांना एकामागून एक सुरक्षितपणे इमारतीतून खाली आणले. मात्र एकंदरीत या घटनेनं मुंबईसह (Mumbai hostage news) राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. अशातच रोहित आर्याने (Rohit Arya) कशाप्रकारे मुलांना कोंडून ठेवलं , पोलिसांनी कसं मुलांना वाचवलं, या सगळ्याची माहिती कोल्हापूरहुन ऑडिशनला आलेल्या नारायणी जाधव (Narayani Jadhav) या मुलीने एबीपी माझाला दिली आहे.

Rohit Arya Dies Mumbai Hostage Case : दरवाजा का बंद केला, आम्हाला वॉशरूमला जायचं

या संदर्भात बोलताना नारायणी जाधव म्हणाली कि, माझं ऑडिशन आधीच झालं होतं. ट्रायल शूट आणि वर्कशॉपसाठी मी मुंबईत आले होते. तीन ग्रुप त्यांनी ऑडिशनचे केले होते आणि खरंतर या वर्कशॉपचा दिवस कालच संपला होता. तरी एक दिवस त्यांनी आजचा वाढवला. रोहित आर्या सोबत आम्ही मागील पाच दिवस कनेक्ट होतो आणि ते आमच्याशी खूप फ्रेंडली होते. थोड्या वेळासाठी आम्ही ज्या ठिकाणी होतो तिकडचा दरवाजा बंद ठेवला होता. त्यानंतर थोडा त्यांनी उघडला आणि आम्हाला वरती जायला सांगितलं. त्यानंतर पुन्हा त्यांनी डोर क्लोज केला आणि आम्ही त्यानंतर त्याला विचारलं की दरवाजा का बंद केला, आम्हाला वॉशरूमला जायचं आहे. त्यांनी सांगितलं की सीन सुरू आहे. त्याच्यामुळे आम्ही दरवाजा बंद केला आहे.

Narayani Jadhav : पोलिसांसोबत चकमक झाली, गोळ्या मारल्या

दरम्यान, बराच वेळ झाला दरवाजा उघडत नव्हता त्यानंतर आमच्या पालकांचा आवाज खालून येत होता. माझ्या आजी सुद्धा माझ्यासोबत पाच दिवस येत होती. मात्र तिला बाहेर गरम होत होतं. त्यामुळे ती आतच आमच्या सोबत एसीमध्ये होते. माझ्या आजीने खाली माझ्या आईला फोन लावला आणि माझी आई रडायला लागली. रोहित आर्या कडे गन होती, मुलांना म्हटले जास्त तुम्ही काही केलं तर मग तुम्हलाला काहीतरी मी करेल. खाली पालकांना फोन करायला त्यांनी सांगितलं आणि तुम्हाला जिवंत घेऊन जायचं तर पैसे द्यायला सांगितले. त्यांनी सगळ्यांनाच गन दाखवली. आम्ही थोडे घाबरलो होतो. मात्र पालकांनी सांगितलं आम्ही वरती येत आहोत, त्यामुळे शांत झालो. एक डायरेक्टर होते त्यांनी आम्हाला वाचवायचा प्रयत्न केला. आम्ही दुसऱ्या रूममध्ये होतो जेव्हा पोलिसांसोबत त्याची चकमक झाली आणि गोळ्या मारल्या. पोलिसांनी काचेचा दरवाजा फोडला. ज्या दरवाजाच्या आतल्या रूममध्ये आम्ही होतो आणि तो दरवाजा माझ्या आजीला लागला. असं नारायणी जाधव हिने सांगितल.

Mumbai Hostage News: नेमका प्रकार काय?

राजधानी मुंबईतील (Mumbai) पवईच्या महावीर क्लासिक बिल्डिंगमील RA स्टूडिओमध्ये एका व्यक्तीने अनेक मुलांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. ओलीस ठेवण्यात आलेली सर्व मुले 15 वर्षांखालील असून 17 मुला-मुलींना एका खोलीत बंद करुन ठेवण्यात आले होते. या मुलांसह 2 पालकही खोलीत बंद होते. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि NSG कमांडो पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांच्या (Police) मदतीने अखेर ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत मुलांची सुटका करण्यात आली. यावेळी, आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली असून पोलिसांच्या चकमकीत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाला.

मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर झाला असून आरोपीने पोलिसांवर गोळी झाडल्यानंतर पोलिसांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी, आरोपीच्या छातीत गोळी लागली होती. त्यामुळे, रोहित आर्यला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हे हि वाचा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
Loan : चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार
India vs South Africa, 2nd Test: क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Naxal Gadchiroli : आत्मसमर्पण केलेल्या नक्षल दांपत्याच्या घरी नवा पाहुणा Special Report
Smriti Mandhana Marriage : स्मृती -पलाशच्या लग्नाची सांगलीत लगबग Special Report
Pune Police : पुणे पोलिसांचा इंगा, मध्यप्रदेशात डंका Special Report
Delhi Blast : जिहादी डॉक्टरांच्या टोळीचं भयंकर कारस्थान Special Report
Mahapalikecha Mahasangram Beed : बीड नगरपरिषदेचा विकास का रखडला? नागरिकांच्या समस्या काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
Loan : चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार
India vs South Africa, 2nd Test: क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
Salary : पगार लवकर संपतो, तज्ज्ञांनी सुचवला 50-30-20 फॉर्म्युला, जाणून घ्या खर्चावर कसं नियंत्रण ठेवायचं?
पगार लवकर संपतो, तज्ज्ञांनी सुचवला 50-30-20 फॉर्म्युला, जाणून घ्या खर्चावर कसं नियंत्रण ठेवायचं?
शहाजी बापूंनी एकटं पाडलं म्हणत आजारपणही सांगितलं, आता जयकुमार गोरेंचा तुम्हीच सुरवात केली म्हणत पलटवार
शहाजी बापूंनी एकटं पाडलं म्हणत आजारपणही सांगितलं, आता जयकुमार गोरेंचा तुम्हीच सुरवात केली म्हणत पलटवार
Shashi Tharoor: तिकडं ममदानी आणि ट्रम्प प्रचारात भिडले अन् व्हाईट हाऊसमध्ये दिलखुलास भेटले; इकडं शशी थरुरांचा मोदी-राहुल गांधींना अप्रत्यक्ष खोचक सल्ला
तिकडं ममदानी आणि ट्रम्प प्रचारात भिडले अन् व्हाईट हाऊसमध्ये दिलखुलास भेटले; इकडं शशी थरुरांचा मोदी-राहुल गांधींना अप्रत्यक्ष खोचक सल्ला
Bank Holiday List : डिसेंबरमध्ये बँका किती दिवस बंद राहणार? आरबीआयच्या यादीनुसार बँकांना किती दिवस सुट्टी असणार? जाणून घ्या
डिसेंबरमध्ये बँका किती दिवस बंद राहणार? आरबीआयच्या यादीनुसार बँकांना किती दिवस सुट्टी असणार?
Embed widget