खोदकामात सापडलेले गुप्तधन स्वस्तात देण्याच्या आमिषाने लूट, राजस्थानी टोळीतील दोन जणांना अटक
मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 12 ने मोठी कारवाई करत लोकांना आमिष दाखवून लूटणाऱ्या राजस्थानी टोळीतील दोन जणांना अटक केली आहे.

मुंबई: घरात खोदकाम करताना जमिनीतून गुप्तधन भेटल्याचे सांगून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या राजस्थानी टोळीतील दोन जणांना क्राईम ब्रँच युनिट 12 ने अटक केली आहे. अंधेरीतील एक दुकानदाराला फसवण्याच्या तयारीत असतानाच या दोन्हीही ठगांना अटक करण्यात आली आहे. मंछाराम नाथुराम परमार (36) जगदिश उर्फ जगाराम दयाराम साखला (32) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने 30 नोव्हेंबरपर्यंत कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक स्टेशनरी दुकान चालवणाऱ्या व्यक्तीकडून या टोळीतील काही व्यक्तींनी खोदकामात सापडलेले गुप्तधन स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून 4.60 लाख रुपये उकळले होते. मात्र त्या ठगांनी बदल्यात एकही दागिना दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे ध्यानात येतात त्या स्टेशनरी व्यावसायिकाने या संदर्भात कुरार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती.
फसवणुकीची तक्रार दाखल झाल्यानंतर क्राईम क्राईम ब्रँच युनिट 12ने तपासासाठी पथके नेमून शोध कार्य सुरू केले. प्राथमिक तपासात हे सर्व आरोपी राजस्थानमध्ये राहणारे असल्याचे समजले. शिवाय हे मुंबईच्या विविध भागात लोकांना खरे सोने दाखवून असेच सोने स्वस्तात देण्याचे अमिष दाखवत असत. यासाठी संबंधितांकडून मोठी रक्कम देखील घेऊन ते फरार होत असत.
या टोळीतील लोक दुकानदाराला एकटे गाठून आम्ही मजुरीची कामे करत आहोत, बांधकामाच्या ठिकाणी खोदकाम करताना गुप्तधन मोठ्या प्रमाणावर सापडले आहे, ते आम्ही स्वस्तात विकत आहोत असे सांगायचं. मात्र आम्ही हे सोने सोनाराला विकू शकत नाही, तो कुठेही खुलासा करू शकतो, मात्र हे सोने तुम्ही तपासून घेऊ शकता असे सांगायचं. संबंधित दुकानदाराचा विश्वास संपादन केल्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी त्याच्याशी पुन्हा संपर्क साधला जायचा. आम्हाला राजस्थानला जायचे असल्याने आम्ही हे सोने तुम्हाला स्वस्तात देत आहोत असे सांगून मोठी रक्कम घेऊन ते फरार होत असत.
या टोळीतील दोघांना क्राईम ब्रँच युनिट 12ने अंधेरी परिसरातून अटक केली असून या दोघांकडून नकली सोने आणि गुन्ह्यासाठी वापरलेले दोन मोबाईल देखील जप्त केले आहेत. सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असून यांनी अजून कुणाकुणाला फसवले आहे याविषयीचा तपास पोलीस करत आहेत.
महत्त्वाची बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
