धक्कादायक! व्हॅलेंटाईन डेच्याच दिवशी प्रेयसीवर चाकूने हल्ला; प्रियकर अटकेत
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रियकराने प्रेयसीवर चाकूने हल्ला केला असून प्रेयसी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.
![धक्कादायक! व्हॅलेंटाईन डेच्याच दिवशी प्रेयसीवर चाकूने हल्ला; प्रियकर अटकेत Mumbai Crime Stabbing girlfriend on Valentines Day Police arrested Boyfriend धक्कादायक! व्हॅलेंटाईन डेच्याच दिवशी प्रेयसीवर चाकूने हल्ला; प्रियकर अटकेत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/28042351/crime-seen.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : व्हॅलेंटाईन डे... या दिवशी अनेकजण आपलं प्रेम व्यक्त करतात. पण याच दिवशी एका प्रियकारानं आपल्या प्रेयसीवर चाकूने हल्ला केला आहे. जुन्या गोष्टींचा राग मनात धरून दोघांमध्ये भांडणं झाली. त्यानंतर प्रियकराला राग अनावर झाला आणि त्याने आपल्या खिशातून चाकू काढून प्रेयसीवर सपासप वार केले. यामध्ये प्रेयसी गंभीर जखमी झाली आहे.
भोईवाडा पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरिक्षक विनोद कांबळे यांनी सांगितलं की, महिलेचं वय 37 वर्ष आहे. सदर महिला मुंबईतील गोवंडी परिसरात राहत होती. ही महिला परळ येथील केईएम रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करत होती.
महिला आणि राजेश काळे नावाचा एक व्यक्ती यांच्या काही दिवसांपूर्वी प्रेमसंबध होते. परंतु, सध्या त्यांच्यात खटके उडत होते. त्याच रागातून राजेश काळेने महिलेवर चाकूने हल्ला केला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. मुंबईतील केईएम रूग्णालयात महिलेवर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश काळेला अटक करण्यात आली असून त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश काळे कुर्ल्यातील परिसरात राहत होता. महिला आणि त्याच्यात काही वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते. व्हेलेंटाईनच्या दिवशी दुपारी जवळपास 3.30 वाजता मुंबईतील परळ परिसरात दोघांमध्ये जुन्या गोष्टींवरुन वाद सुरु झाला. दोघांमधील वाद वाढत गेला. त्यानंतर राजेशने आपल्या खिशातून चाकू काढून 4 ते 5 वेळा महिलेच्या पोटावर सपासप वार केले.
महिलेच्या पोटातून रक्त येताना पाहून राजेश घाबरला आणि तिथून पळून गेला. घटनेनंतर आजूबाजूच्या लोकांना पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. तसेच महिलेला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिला आयसीमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसेच महिलेची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)