Mumbai Crime News: अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवताना व्हायग्राच्या अतिसेवनामुळे मृत्यू, वाचा ग्रँटरोडच्या हॉटेलमधील इनसाईड स्टोरी
Mumbai Crime News: एका अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी संजयकुमार तिवारीने काही गोळ्या खाल्ल्या होत्या.
Mumbai Crime News: शारीरिक संबंधांवेळी एका 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत (Mumbai Crime News) घडली होती. ग्रँटरोड येथील डी.बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. संजयकुमार तिवारी असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेची चौकशी सध्या पोलिसांकडून सुरु असून यादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एका अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी संजयकुमार तिवारीने काही गोळ्या खाल्ल्या होत्या. संबंधानंतर काही तासाने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत घोषित करण्यात आले. सदर घडलेला सर्वप्रकार संबंधित अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितला. यानंतर मयत व्यक्तीविरुद्ध पोक्सो, लैंगिक अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
स्वतःच्या 17 वर्षांच्या मुलीच्या आधारकार्डवर एन्ट्री-
मयत व्यक्ती संजयकुमार तिवारीचे लग्न झाले असून त्याला 17 वर्षांची मुलगी आहे. त्याच्या मुलीचे तसेच यातील पीडित मुलीचे नाव सारखे आहे. त्याने स्वतःच्या 17 वर्षाच्या मुलीच्या आधारकार्डवर एन्ट्री केल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.
ग्रँटरोडमधील हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?
संजयकुमार तिवारी देखील गुजरातमधील एका डायमंड कंपनीत काम करत होता. सदर अल्पवयीन मुलगी गुजरातची रहिवाशी असून या मुलीला तिचे वडील आजारी असताना संजयकुमार तिवारीने आर्थिक मदत केली होती. तसेच मदतीच्या बहाण्याने तिच्या घरी ये-जा सुरू होती. त्यानंतर तो अल्पवयीन मुलीला मुंबईत फिरण्यासाठी घेऊन आला आणि बनावट आधारकार्डद्वारे हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे काही गोळ्या खाऊन त्याने मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तो बेशुद्ध पडल्याने मुलीने तेथील कर्मचाऱ्यांना कळवले. त्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी जवळील डी.बी. मार्ग पोलिसांना संपर्क करत सदर घटनेची माहिती दिली. जे.जे रुग्णालयात उपचारासाठी संजयकुमार तिवारीला नेले असता, त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
नेमकं कोणत्या गोळ्या घेतल्या?, पोलिसांकडून तपास सुरु-
दरम्यान पोलिसांनी मृत आरोपी संजय विरोधात अल्पवयीन मुलीवर अत्यचार केल्याच्या आरोपाखाली पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी आणि कृती करण्यापूर्वी त्याने कोणती टॅब्लेट घेतली होती की नाही, हे शोधण्यासाठी ते वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहेत. अहवाल आल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळाली.