महिलेसह, तीन वर्षांच्या चिमुकलीला जिवंत जाळणाऱ्या झोपडपट्टी दादाला मरेपर्यंत फाशी; मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय
Mumbai Crime News: स्थानिक महिलेच्या लैंगिक छळाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेसह तीन वर्षांच्या मुलीला जिवंत जाळल्याप्रकरणी सत्र न्यायालयानं 39 वर्षीय आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
Mumbai Crime : एका महिलेवर होणाऱ्या लैंगिक छळाविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेसह तीन वर्षांच्या मुलीला जिवंत जाळल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Sessions Court) आरोपीली फाशीची शिक्षा सुनावली आहे. 39 वर्षीय दीपक जाट या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए. सुब्रमण्यम यांनी लैंगिक छळाविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेसह तीन वर्षांच्या मुलीला जिवंत जाळल्याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
झोपडपट्टीतील दादा दीपक जाट परिसरातील एका महिलेचा लैंगिक छळ करायचा. याची माहिती मिळताच परिसरातील एका महिलेनं याविरोधात आवाज उठवला. त्यामुळे आरोपी दीपकनं महिलेवर चक्क पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळंल होतं. एकाच वेळी अनेक महिलांवर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा आरोपीनं प्रयत्न केला होता. त्यात एका लहान मुलीचाही समावेश आहे. त्यामुळं आरोपी दीपक जाट कुठल्याही दयेसाठी पात्र नसून तो समाजात राहण्यासाठी योग्य नाही. समाजाला त्याच्यापासून धोका आहे. तसेच, तो सुधरण्याची शक्यता अजिबातच नाही. त्यामुळे त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात येत असल्याचं कोर्टानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.
प्रकरण नेमकं काय?
मुंबईच्या वांद्रे रेक्लमेशन परिसरातील झोपडपट्टी साल 2017 मध्ये आरोपी दीपक जाट महिलांचा लैंगिक छळ करायचा. त्यामुळेच स्थानिकांनी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याचा राग मनात धरून त्यानं परिसरातील महिलांचा बदला घेण्याचं ठरवलं होतं. 14 एप्रिल 2017 च्या दिवशी त्यानं एका महिलेवर पेट्रोल टाकलं आणि तिथून पळून गेला. पीडीत 18 वर्षीय एक तरुणी त्यादिवशी शेजाऱ्यांसोबत आपल्या घराबाहेर बसली होती. त्यावेळी आरोपीनं तिला गाठलं आणि तिच्यावर पेट्रोल ओतलं. या घटनेत तिच्यासोबत शेजारी राहणारी तीन वर्षांची मुलगीही आगीत होरपळली होती. स्थानिकांनी तात्काळ तरुणी आणि तीन वर्षांच्या चिमुकलीला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर तरुणीसह तीन वर्षांच्या मुलीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
दोषीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा
मुंबई सत्र न्यायालयानं लैंगिक छळाविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेसह तीन वर्षांच्या मुलीला जिवंत जाळल्याप्रकरणी फिर्यादी तसेच, बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला, त्यानंतर आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. एकाच वेळी अनेक महिलांवर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा आरोपीनं प्रयत्न केला आहे. त्यात एका लहान मुलीचाही समावेश आहे. त्यामुळं आरोपी दीपक जाटला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात येत आहे, असं मुंबई सत्र न्यायालयानं म्हटलं. तसेच, दोषीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.