मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं भोवलं; गुन्हा दाखल
Mumbai Crime News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं एका नेटकऱ्याला चांगलंच भोवलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Crime News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर ट्वीटच्या माध्यमातून आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात युवा सेनेचे सचिव किरण साळी यांनी फिर्याद दिली आहे. @bhujangashetti या ट्विटर हॅंडलच्या (Twitter Handle) चालकावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 153 (अ), 500, 505 (2) अंतर्गत हा गुन्हा दाखल (Crime News) करण्यात आला आहे.
किरण साळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, "सदर ट्विटर हॅंडलनं समाजात असंतोष निर्माण होईल, या उद्देशानं 11 ते 14 ऑक्टोबर, 2022 दरम्यान आक्षेपार्ह, महिलांना अपमानास्पद, लज्जास्पद आणि आपत्ती निर्माण होईल, असा मजकूर पोस्ट केला आहे."
या प्रकरणा संदर्भात बोलताना किरण साळी म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांविरोधातील आक्षेपार्ह टीका आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. त्यांना कडक कायदेशीर भाषेतच उत्तर दिलं जाईल. समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी काही घटक यात जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांची बदनामी करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा समाजकंटकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी."
महाराष्ट्र सायबर अधिक्षकांकडे कडक कारवाईची युवा सेनेची मागणी
सायबर पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी युवासेना सचिव किरण साळी यांनी केली आहे. राज्याच्या सायबर सेलचे पोलीस अधिक्षक संजय शिंत्रे यांच्याकडे साळी यांनी यासंदर्भात मागणी केली आहे. कारवाईच्या मागणीचं पत्र साळी यांनी शिंत्रे यांना दिलं असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन शिंत्रे यांनी दिलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
दारुच्या नशेत विराट-रोहितला शिवीगाळ, संतापलेल्या चाहत्यानं मित्रालाच संपवलं