(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दारुच्या नशेत विराट-रोहितला शिवीगाळ, संतापलेल्या चाहत्यानं मित्रालाच संपवलं
Murder for Virat and Rohit : विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल आपत्तीजनक वक्तव्य केल्यामुळे एका चाहत्यानं मित्राचीच हत्या केली आहे. या प्रकारानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
Murder for Virat and Rohit : भारतामध्ये क्रिकेटला धर्माचा दर्जा दिला जातो. चाहते आपल्या आवडच्या क्रिकेटपटूसाठी काहीही करतात. एखाद्या क्रिकेटपटूला ट्रेल केलं जाते, तितकेच त्याला प्रेमही करतात. भारतामध्ये क्रिकेट चाहत्यांची कमी नाही. अनेकदा आवडत्या क्रिकेटपटूसाठी चाहते प्रत्येक हद्द मोडायला तयार असतात. पण तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल आपत्तीजनक वक्तव्य केल्यामुळे एका चाहत्यानं मित्राचीच हत्या केली आहे. या प्रकारानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वक्तव्यानुसार, तामिळनाडूमधील अरियालूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. दारु प्यायला बसल्यानंतर एका तरुणानं विराट कोहली आणि रोहित शर्माला शिवीगाळ केली. त्यानं अनेक आपत्तीजनक शब्दांचा वापर केला. ही बाब चाहत्याला खटकली. संतापलेल्या चाहत्यानं त्याला संपवलं. स्थानिक पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहेत.
आरोपीच्या मित्राने दारुच्या नशेत विराट कोहली आणि रोहित शर्माला शिवीगाळ केली होती. आपत्तीजनक शब्दांचा वापरही केला. हीच गोष्ट आरोपीला खटकली. त्यानं मित्राला संपवलं. मृत व्यक्तीचं नाव विग्नेश आहे तर आरोपीचं नाव धर्मराज असं आहे. धर्मराज 21 वर्षाचा आहे. तर मृत विग्नेश 24 वर्षाचा होता.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी दोन मित्र दारु प्यायला बसले होते. त्यानंतर विग्नेश घरी होता. आराम केल्यानंतर संध्याकाळी धर्मराज आणि विग्नेश पुन्हा भेटले. अन्य एका मित्राने त्यांना दारु पिण्यासाठी बोलवलं. त्यानंतर हे तिघेजण दारु पीत होते. त्याच वेळी विग्नेशनं विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल अनेक आपत्तीजनक शब्दांचा वापर केला. शिव्याही दिल्या. ही गोष्ट धर्मराजला खटकली. विग्नेशचा धर्मराजला राग आला. रागाच्या भरात धर्मराजनं विग्नेशची हत्या केली. त्यानंतर तिथून पळ काढला. पोलिसांनी धर्मराजला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले. कोर्टानं धर्मराजला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडिया -
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे. येथे भारतीय संघानं सराव सुरु केला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा नेटमध्ये घाम गाळत आहे. 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरोधातील सामन्यापासून भारताची टी 20 विश्वचषाकला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलिाय आणि दक्षिण आफ्रिका यांचा पराभव केल्यानंतर भारतीय संघ विश्वचषक उंचावण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 2007 नंतर भारताला टी 20 विश्वचषक जिंकता आलेला नाही.