Mumbai Crime News : चहा शौकिनांनो सावधान! चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या गँगचा पोलिसांकडून पर्दाफाश
Mumbai Crime News : चहा शौकिनांना सावध करणारी बातमी! चहा भेसळ करणाऱ्यापावडरमध्ये गँगचा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. तर 430 किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त करण्यात आली आहे.
Mumbai Crime News : चहासाठीच जन्म आमुचा... असं अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळतं. चहा म्हणजे, अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. दिवसाची सुरुवात असो, वा कट्ट्यावरच्या गप्पा किंवा मग रेंगाळणारी संध्याकाळ... चहा हवाच. सकाळी उठल्यावर वाफाळलेल्या चहा मिळाला नाहीतर अनेकांची झोपही उडत नाही. पण तुम्ही पित असलेला चहा खरंच चांगला आहे? सकाळी-सकाळी तुम्ही पीत असलेला चहा भेसळयुक्त तर नाही ना? असा विचार करायला लावणारी एक बातमी हाती आली आहे. मुंबई (Mumbai Crime News) पोलिसांनी चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या गँगचा पर्दाफाश केला आहे.
मुंबईतील (Mumbai Crime News) शिवडी (Sewri) बंदर रस्त्यावर पोलिसांनी छापेमारी करत तब्बल 430 किलो भेसळयुक्त चहा पावडर जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजू अबुलअजहर शेख आणि राहुल शेख नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. यांच्याकडून कुणाकुणाला या भेसळयुक्त चहाचा पुरवठा होत होता, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
आतापर्यंत दुधात भेसळ, पनीरमध्ये भसेळ, खव्यात भेसळ अशा बातम्या ऐकल्या आहेत. पण आता चक्क चहा पावडरमध्येही भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या रॅकेट उद्ध्वस्थ केल्यामुळे खळबळ माजली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईतील शिवडी बंदर रोडवर छापेमारी केली. या छापेमारीत तब्बल 430 किलो चहापावडर जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या भेसळयुक्त चहा पावडरची किंमत तब्बल 85 हजार रुपये सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत. तसेच, या भेसळ करणाऱ्या गँगमध्ये आणखी किती लोक आहेत, याचाही तपास पोलिसांकडून सुरु आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :