Mumbai Crime News: डोक्यात टपली मारून केसाला स्पर्श, विरोध करताच खुर्ची फेकली अन्....; मुख्याध्यापकाकडून सहशिक्षिकेचा विनयभंग, मुंबईतील संतापजनक घटना
Mumbai Crime News: मुंबई महानगर पालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापकाकडून महिला सहशिक्षिकेचा विनयभंग करत तिला मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय.

Mumbai Crime News: मुंबईच्या अंधेरी (Andheri) पश्चिमेतील डी.एन. नगर परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (NMC) मराठी माध्यम शाळेतील (School) मुख्याध्यापकाने महिला सहशिक्षिकेचा विनयभंग करत मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अंधेरी पश्चिमेतील डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या अगदी शेजारी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत हा प्रकार घडला. पीडित 55 वर्षीय महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून शाळेचे मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्याविरोधात डी.एन. नगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Mumbai Crime News: धमकी देत केला विनयभंग
महिला शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनुसार, मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी तिला वारंवार केबिनमध्ये एकटीला बोलावून घेतले. मोबाईलवर रेकॉर्डिंग करून रिपोर्टसह वरिष्ठांकडे पाठवून कारवाई करण्याची धमकी देत त्यांनी विनयभंग केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, वर्गात अध्यापन करत असताना मुख्याध्यापक वारंवार “चहा घ्या, फळ घ्या” असे म्हणत वाईट नजरेने पाहत असल्याचाही उल्लेख तक्रारीत आहे.
Mumbai Crime News: महिलेवर खुर्ची फेकून मारली
घटनेचा कळस 19 तारखेला झाला. त्या दिवशी मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी महिला शिक्षिकेच्या डोक्यावर टपली मारत केसांना स्पर्श केला. याला महिलेने तीव्र विरोध केला. विरोध केल्यामुळे रागाच्या भरात मुख्याध्यापकांनी तिच्यावर खुर्ची फेकून हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात महिला शिक्षिकेच्या एका पायाला दुखापत झाली आहे.
Mumbai Crime News: मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून डी. एन. नगर पोलिसांनी मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या























