Mumbai Crime News : मित्राकडून मैत्रीचा विश्वासघात!अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार अन् चित्रीकरण; मायानगरी पुन्हा हादरली
Mumbai Crime News : मायानगरी मुंबई आज लैंगिक अत्याचाराच्या वेगवेगळ्या धक्कादायक घटनांनी पुन्हा एकदा हादरली आहे.
Mumbai Crime News : मुंबईच्या कांदिवली परीसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात अल्पवयीन मुलीला भेटायला बोलावून तिच्याच तीन मित्रांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार (Mumbai Crime) केला, तसेच हे कृत्य करून त्याचे चित्रीकरण ही केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दरम्यान हे प्रकरण उजेडात येताच या प्रकरणी आता 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करून तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात आरोपींविरोधात सामुहिक बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण(पोक्सो) आणि माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी शिक्षण घेत असून 6 जानेवारीला हा प्रकार घडला आहे. पीडित मुलीला आरोपींनी काही कारण देत तिला भेटायला बोलावले. त्यानंतर तिघांनी मिळून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना घडलीय. मात्र यातील आरोपी इथवरच थांबले नाही तर त्यानंतर त्याचे चित्रीकरण ही त्यांनी केले आहे. या प्रकारानंतर पीडित मुलगी प्रचंड घाबरली असून त्यानंतर तीने याबाबत वाचा फोडत तिने या प्रकरणी समतानगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत यातील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर ताब्यात घेण्यात आलेले आरोपी हे 18, 20, आणि 21 वयोगटातील आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींकडील मोबाईलही जप्त केले असून ते न्यायवैधक प्रयोगशाळेत तपासणी करत पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लैंगिक अत्याचारांच्या घटनांनी मायानगरी पुन्हा हादरली!
मायानगरी मुंबई आज लैंगिक अत्याचाराच्या वेगवेगळ्या धक्कादायक घटनांनी पुन्हा एकदा हादरली आहे. यात पहिल्या घटनेत मुंबईच्या मालाड परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवस्त्र फोटो सार्वजनिकरित्या वायरल केल्या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर पीडित मुलगी ही गोरेगावच्या एका नामंकित शाळेत शिक्षण घेत होती. दरम्यान 1 डिसेंबर रोजी पीडित तरुणीला एका आरोपीने धमकावून तिच्याकडून तिचा विवस्र फोटो मागून घेतला. तो फोटो आरोपीने त्याच्या परिसरात रहात असलेल्या 19 वर्षीय दुसर्या आरोपीला पाठवला. त्याने तो फोटो पुढे 18 वर्षीय मित्राला पाठवला. या आरोपीने तो फोटो काॅलेजच्या ग्रुपमधील मुलांना दाखवून पिडीत मुलीची बदनामी करत फोटो सार्वजनिक केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेने बांगूरनगर पोलिसात तक्रार नोंदवली
तर दुसरी घटना अल्पवयीन मुलीला भेटायला बोलवून तिच्याच तीन मित्रांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केल्याची घटना समोर आली आहे. कांदिवली परीसरात ही धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
दरम्यान, तिसऱ्या घटनेत मुंबईच्या दिंडोशी पोलिस स्टेशनच्या हद्दीत अशीच एक धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. एका 78 वर्षींय वृद्ध महिलेवर एका 20 वर्षांच्या युवकाने अत्याचार केल्याचं समोर आलंय. या वृद्ध महिलेला विस्मरणाचा आजार असून त्याचा फायदा घेत या युवकाने तिच्यावर अत्याचार केल्याचं उघड झालं. घरातील सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आल्यानंतर युवकावर गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली.
पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर 20 वर्षांचा आरोपी प्रकाश मोरियाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 64(1) आणि 332(B) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आणि न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने आरपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा