एक्स्प्लोर

Mumbai Crime : वॉचमनने तिच्यावर अतिप्रसंग करुन हत्या केली आणि नंतर रेल्वेखाली उडी मारून स्वतःला संपवलं, मरिन लाईन वसतीगृहातील मुलीच्या हत्येचं गुढ उलगडलं

Mumbai Crime Latest Update : आरोपीचे नाव ओमप्रकाश कनोजिया असे असून तो तब्बल 18 वर्षे या वसतिगृहात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता.

मुंबई: मरिन लाईनजवळील एका मुलीच्या वसतीगृहातील 19 वर्षीय मुलीच्या हत्येचं गुढ काही तासातच उलगलडं आहे. त्या वसतीगृहाच्या वॉचमनने तिच्यावर अतिप्रसंग करुन तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मुलीची हत्या केल्यानंतर त्या वॉचमनने स्वतः रेल्वेखाली उडी मारून जीव दिला असल्याचं पोलिस तपासातून समोर आलं आहे. 

आरोपीचे नाव ओमप्रकाश कनोजिया असे असून तो तब्बल 18 वर्षे या वसतिगृहात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. पीडितेवर अतिप्रसंग करून त्याने तिची हत्या केली आणि स्वतः रेल्वेखाली उडी मारून जीव दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेमधील काही सीसीटीव्ही चेक करण्यात आले होते. त्या आधारे आरोपीची ओळख झाली असून त्याच्या परिवाराशीसुद्धा संपर्क साधण्यात आलेला आहे. 

आरोपीच्या खिशातून दोन चाव्या सुद्धा सापडले आहेत अशी पोलिसांची माहिती आहे. रेल्वे पोलिसांनी या संदर्भात ADR दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच ही मुलगी बांद्रामधील एका कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षीय विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील एका स्थानिक वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम करतात.

काय आहे प्रकरण?

मरीन ड्राईव्हजवळील असलेल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात (Savitridevi Phule Girls Hostel) 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी पोलिसांना एक कॉल आला होता. पोलिसांना माहिती मिळाली होती की सावित्रीबाई फुले हॉस्टेलमध्ये एक मुलगी मृत सापडली आहे आणि दरवाजा बाहेरून लॉक आहे. 

गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय 

मरीन ड्राईव्ह पोलिसांनी (Marine Drive Police) घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. सायंकाळी वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर मृतदेह आढळून आला. सूत्रांनी सांगितले की या मुलीची हाताने गळा दाबून हत्या (Marine Line Hostel Girl Murder) करण्यात आली आहे. या प्रकरणात वसतिगृहाच्या वॉचमनवर संशय होता आणि तो सकाळपासून बेपत्ता होता. ही हत्या झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच, रात्री त्या वॉचमनचा मृतदेह आढळला आहे. या वॉचमनचा मृतदेह हा चर्नी रोड पोलिस स्टेशनच्या (Charni Road Murder) जवळ असलेल्या रेल्वे ट्रॅकवर मिळाला. या वॉचमनचे नाव ओमप्रकाश कनौजिया असं असून त्याचं वय 53 वर्षे असल्याचं सांगण्यात येतंय. 

ही संबंधित बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सMahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
Embed widget