Mumbai News : सीआयएसएफ कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून संपवलं आयुष्य, मुंबईतील बीकेसी परिसरातील घटनेमुळे खळबळ
Mumbai News : मुंबईतील बीकेसी परिसरातील जिओ गार्डनजवळ एका सीआयएसएफ कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
![Mumbai News : सीआयएसएफ कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून संपवलं आयुष्य, मुंबईतील बीकेसी परिसरातील घटनेमुळे खळबळ Mumbai CISF constable ends his life by shooting himself in BKC Jio Garder detail marathi news Mumbai News : सीआयएसएफ कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून संपवलं आयुष्य, मुंबईतील बीकेसी परिसरातील घटनेमुळे खळबळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/08/c51ca4ea6c5578de4a364ecddcbd96bc1702059076188290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुकेश खेतरिया या सीआयएसएफ (CISF) कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या (Sucide) केल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील (Mumbai) बीकेसी (BKC) परिसरातील जिओ गार्डनजवळ ही घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश खेतरिया असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे. तो गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील आहे. मुकेशने त्याच्याकडे असलेल्या AK 47 रायफलने स्वतःवर गोळी झाडली. ही घटना शनिवार 16 डिसेंबर रोजी घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेशची ड्युटी जिओ गार्डनच्या गेट क्रमांक 5 वर होती. तिथे ड्युटी करत असताना त्याने गोळी झाडून आत्महत्या केली. त्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम पोहचली. त्यांनी घटनास्थळावरुन पुरावे देखील गोळा केलेत. पोलिसांनी तात्काळ मुकेशला सायन रुग्णालयात नेले. पण तिथे पोहचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुकेशने हा टोकाचा निर्णय का घेतला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.
पोलिसांचा तपास सुरु
या प्रकरणी बीकेसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांना घटनास्थळी त्याची एके 47 आणि 29 जिवंत राऊंड सापडलेत. मुकेशच्या मृत्यूबाबत सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी मुकेशचे वडील खोडाभाई यांना माहिती दिली आहे. या घटनेमुळे बीकेसी परिसरात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)