एक्स्प्लोर

सूडाची भावना की दहशतवादी कट? आरोपीने मुंबईतच 15,000 लोकांसाठी बनवल्या विषारी गोळ्या; 4 जुलैंपर्यंत कोठडी

मुंबईत शुक्रवारी मोहरमच्या जुलूसमध्ये विषारी कॅप्सूल वाटल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी, फय्याज प्रेमजी असं अटक आरोपीचं नाव आहे.

मुंबई : मोहरम सणाचा उत्साह मुस्लिम (Muslim) बांधवांमध्ये पाहायला मिळत असून मोहरमच्या दिवशी मुंबईतील (Mumbai) रे रोड भागातील रेहमताबाद कब्रस्तानजवळील अशुरा मिरवणुकीत सहभागी झालेल्या बांधवांना एक कॅप्सूल देण्यात आलं होतं. या कॅप्सूलच्या माध्यमातून अनेक हजारो लोकांना संपवण्याचा प्लान असल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात आलं. आरोपी फय्याज प्रेमजीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी होती, ती कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा माझगाव कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने (Court) आता 4 जुलैपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, पोलिसांचे पथक तपासासाठी परराज्यात पोहोचले आहे.  

मुंबईत शुक्रवारी मोहरमच्या जुलूसमध्ये विषारी कॅप्सूल वाटल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी, फय्याज प्रेमजी असं अटक आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 14 हजार 900 कॅप्सूल ताब्यात घेतल्या आहेत. संबंधित आरोपीने 50 किलो झिंक फॉस्फाइड ऑनलाइन मागवलं होतं. तसेच 30 हजार रिकाम्या कॅप्सूल देखील मागवल्या होत्या. हा आरोपी 15 दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. नागपाडा परिसरातील सन डॉरमिटीमधे तो राहिला होता, याच ठिकाणी त्याने कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फेट भरण्याच काम केलं, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्याने दिलेल्या गोळ्या खाल्ल्याने काहींना विषबाधा होऊन ते रुग्णालयात भरती झाले आहेत.

दहशतवादी कट होता का?

पोलिसांनी आरोपीकडून 14,900 विषारी गोळ्या जप्त झालेल्या आहेत. आरोपीच्या फोनमधून ज्या लोकांकडून झिंक फॉस्पाइट घेतलं आहे, त्यांचा ठावठिकाणा शोधायचा आहे. आरोपी राज्याबाहेरही जाऊन आला आहे, त्यामुळे सखोल चौकशी आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. आरोपीने 30 हजार कॅप्सूल बनवल्याचा संशय आहे, आतापर्यंत फक्त 14 हजार जप्त झालेल्या आहेत, त्यामुळे उर्वरीत गोळ्या शोधायचा आहेत, आरोपी फैय्याज हा इराक आणि इराणला जाऊन आलेला आहे, त्यामुळे हा दहशतवादी कट आहे का? अंतराष्ट्रीय कनेक्शन आहेत का? ते शोधायचे आहे. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झालेली आहे. त्यामुळे, आरोपीला 7 दिवस पोलीस कोठडी हवी आहे, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. त्यानंतर, न्यायालयाने आरोपी फय्याज प्रेमजीला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

पोलीस तपासासाठी परराज्यात

मुंबईच्या भायखळा येथील विषारी गोळ्या वाटप प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलीस परराज्यात गेले असून आरोपी फैयाज प्रेमजीने झिंक फॉस्पाईट परराज्यातून मागवल्याची माहिती आहे. आरोपीने ह्या गोळ्या कश्या बनवल्या आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला झिंक फॉस्पियाईत कसे पुरवले गेले, याचा तपास सुरू आहे. काही ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आरोपीने हा माल ऑर्डर केल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. आरोपीने जिथून झिंक फॉस्पाईट मागवले त्या राज्यात पोलीस पोहोचले असून अधिक तपास सुरू आहे. 

सूडाच्या भावनेतून कृत्य

सूडाच्या भावनेतून फैय्याज याने मोहरमचे निमित्त साधून समाजातील मुस्लीम बांधवांना धडा शिकवण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. फैयाज आणि त्याचा भाऊ या दोघांना त्याच्या पत्नींनी सोडून दिले होते. या मागे समाजातील लोकांचा मोठा हात असल्याचा समज त्यांचा होता. यातून समाजाला धडा शिकवण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तसेच महिनाभरापासून फैयाज या कटाची तयारी करत होता. यासाठी मोबाइलच्या माध्यमातून “झिंक फॉस्फाईड” औषध कंपन्या, कॅप्सूल बनवण्याची पद्धत त्यांचे साहित याबाबतची माहिती इंटरनेटवरून गोळा केली होती. फैयायजच्या मोबाईलमधून याबाबतची माहिती त्याने इंटरनेटवर सर्च केल्याचे आणि लोकांना मारण्यासंदर्भातले चॅटिंगही आढळून आले आहेत.

हेही वाचा

नसरापूर प्रकरणात न्याय मिळाला, मुख्यमंत्र्यांचे कौतुक; आता संतोष देशमुख प्रकरणी तोच नियम लावा, जरांगेंची भूमिका

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget