Kalyan: धावत्या लोकलमधून मोबाईल हिसकावला, रेल्वे पोलिसांनी चोरट्यांना ठोकल्या बेड्या
Crime News: कल्याणमध्ये धावत्या लोकलमधून महिलेचा मोबाईल चोरल्याची घटना घडली आहे. कल्याण रेल्वे स्थानकातील फलाटावर दोन ट्रेन उभ्या होत्या.
Crime News: कल्याणमध्ये धावत्या लोकलमधून महिलेचा मोबाईल चोरल्याची घटना घडली आहे. कल्याण रेल्वे स्थानकातील फलाटावर दोन ट्रेन उभ्या होत्या. एका ट्रेनमध्ये एक महिला मोबाईलवर बोलत होती. दोन चोरट्यांची नजर त्या महिलेवर गेली. या चोरट्यांनी संधी साधत एका ट्रेनमधून दुसऱ्या ट्रेन मध्ये बसलेल्या महिलेचा मोबाईल हिसकावून पळ काढला. सीसीटीव्ही व खबऱ्याच्या सहाय्याने कल्याण रेल्वे पोलिसांनी दोन्ही चोरटट्यांना मुंब्रा येथून अटक केली आहे. हे दोघे सराईत चोर असून आत्तार्पयत या दोघांनी किती चोरीच्या घटना केल्या आहेत. याचा तपास पोलीस करत आहेत रस्त्यावर मोबाईल हिसकावण्याचा घटना घडत होत्या. आत्ता धावत्या ट्रेनमध्ये चोरटे मोबाईल हिसकावून पळू लागल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी धावत्या रेल्वे गाड्यासह प्लॅटफॉर्म गस्त वाढविली पाहिजे अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.
कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ए वर मुंबईच्या दिशेनें जाणारी लोकल ट्रेन उभी होती. याच दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर आसनगावच्या दिशेने जाणारी लोकल ट्रेन आली. आसनगावला जाणाऱ्या ट्रेनमध्ये विंडो सीट वर एक महिला मोबाईल वर बोलत होती. समोरच्या बाजूला प्लँटफॉर्म वर उभ्या असलेल्या चोरट्याची नजर त्या महिलेवर गेली. याच दरम्यान फ्लॅटफॉर्म क्रमांक एक ए वर आलेली लोकल सुरू झाली. ही संधी साधत या दोन्ही चोरट्यांनी सुरू झालेल्या लोकल मध्ये शिरून दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या लोकल मधील महिलेचा मोबाईल हिसकावून त्याच ट्रेन ने पळ काढला.
याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण जीआरपीच्या महिला पोलिस निरिक्षक अर्चना दुसाने आणि पोलिस निरिक्षक पंढरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू केला. अखेर पोलिसांनी गुप्त माहितीदार आणि सीसीटीव्हाच्या सहाय्याने दोन्ही चोरट्यांना मुंब्रा येथून अटक केली. आवेश सिद्धीकी जाहिद हुसेन अन्सारी अशी या दोन्ही चोरट्याची नावे आहेत. या दोघांच्या विरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहे. या दोघांनी यापूर्वी किती चोऱ्या केल्या आहेत याचा तपास पोलिस करीत आहे.