यवतमाळ : उमरखेड येथील बालरोगतज्ज्ञ हत्त्या प्रकरणात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 5 पथक तैनात करण्यात आली आहेत. 24 तासांमध्ये मारेकऱ्यांना अटक न झाल्यास आज पूर्ण यवतमाळ जिल्हा आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टरांचं काम बंद आंदोलन करण्याचा आयएमए संघटनेनं इशारा दिला आहे. 


यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथे मंगळवारी सायंकाळी उत्तरंवार रुग्णालयाच्या बालरोगतज्ज्ञांची गोळ्या घालून निर्दयीपणे हत्त्या करण्यात आली. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. 


42 वर्षीय डॉ. हनुमंत धर्मकारे हे उमरखेड येथील उत्तरंवार रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. शिवाय त्यांचं उमरखेड येथे खासगी क्लिनिकसुध्दा आहे. डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्यावर मंगळवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केल्यानं त्यात त्यांचा मृत्यू झाला. डॉ. धर्मकारे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस विभागानं 5 पथकं तयार केली आहेत. सध्या पोलीस सीसीटीव्हीच्या आधारेसुध्दा तपास करीत आहेत. या प्रकरणचा छडा लावण्यासाठी पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. 


उमरखेड येथील राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उमरखेडमध्ये तळ ठोकून बसले आहेत. डॉ. धर्मकारे यांच्या छातीत एक आणि पाठीत तीन अशा चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी उत्तरवार रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 


काल (बुधवारी) उमरखेड शहरात खासगी रुग्णालयासह उत्तरवार उपजिल्हा रुग्णालयाची ओपीडीसुध्दा बंद ठेवण्यात आली होती. अज्ञात आरोपींनी डॉक्टरवर गोळीबार कुठल्या कारणातून केला? याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी एकूण वेगवेगळ्या 15 पैलूंवर तपास केंद्रीत केला असून या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सध्या पोलिसांची 5 पथकं या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी कार्यान्वित केली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे यांनी दिली आहे. 


उमरखेड येथील उत्तरावार उपजिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्यावर मंगळवारी अज्ञात व्यक्तीनं गोळीबार करून हल्ला केला. या प्रकरणी आज आयएमए यवतमाळ तसेच मॅग्मो संघटनेचे पदाधिकारी यांनी काल (बुधवारी) जिल्ह्याचे पालकमंत्री  संदिपान भुमरे यांना निवेदन देऊन डॉ. धर्मकारे यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी कार्यवाही करून त्यांच्या कुटुबियांना न्याय देण्यात यावा अशी मागणी केली.


सध्या उमरखेड येथील सर्व शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम बंद ठेवलं आहे आणि 24 तासांमध्ये मारेकऱ्यांना अटक न झाल्यास आज पूर्ण यवतमाळ जिल्हा आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयएमए तर्फे डॉक्टरांचं काम बंद आंदोलन करण्यात येईल असे आयएमएचे माजी राज्याध्यक्ष डॉ. टीसी राठोड यांनी सांगितलं आहे. दिवसाढवळ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याची उमरखेडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरच हत्या झाल्यानं वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचं वातावरण आहे. आता आरोपींना 24 तासांत अटक न झाल्यास वैद्यकीय संघटनांनी आक्रमक भूमिका घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील यंत्रणा प्रभावित होण्याची शक्यता आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह