वसई : मॉर्निग वॉकला जाणा-या महिलांच्या गळ्यातील मंगळसुञ, सोनसाखळी चोरणा-या सराईत चोराला विरार पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक केली आहे. त्याच्याकडून सोन्याच्या साखळी आणि मंगळसुञाबरोबर सहा मोटार सायकली ही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. जवळपास 8 लाख 80 हजाराचा मुद्देमाल आरोपीकडून पोलिसांनी हस्तगत केला आहे.


 वसई विरार आणि नालासोपारारच्या विविध भागात मॉर्निग वॉकला जाणा-या महिलांना टार्गेट करुन त्यांच्याकडील सोन्याची चेन आणि मंगळसुञ हिसकावून नेणा-या सराईत चोराला विरार पोलिसांनी अटक केली आहे. अजय किरण शाह असं आरोपीच नाव असून, त्याच्यावर वसई विरार नालासोपारात 15 गुन्हे दाखल आहेत. त्यातील पाच गुन्हयात तो  फरार आहे.  हा कधी मोबाईल वापरत नसल्याने त्याचा मागोवा काढणं पोलिसांना कठीण जात होतं. मात्र पोलिसांना त्याची पत्नी गरोदर असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी वसई विरार आणि पालघर जिल्ह्यातील सर्व  रुग्णालयात करुन, त्याला सातपाटी येथून अटक केलं आहे.  


 या सराईत आरोपीकडून विरार पोलिसांनी 3 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 6  मोटारसायकली, 5 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 104 ग्राम वजनाच्या 8 सोन्याच्या चेन आणि मंगळसूत्र असा एकूण 8 लाख 80 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वसई न्यायालयाने आरोपीला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  या आरोपीने  आणखी कुठे चोऱ्या केल्या आहेत का..? याचा अधिक तपास आता विरार पोलीस करत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह