Goa Election 2022 : आगामी काळात पाच राज्याच्या निवडणुका (Assemnbly Election 2022) होऊ घातल्या आहेत त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) तयारी सुरु केली आहे. शिवसेना (Shiv Sena) गोव्यासह उत्तरप्रदेशमध्ये निवडणुक लढण्याच्या तयारीत आहेत पण शिवसेनेला आतापर्यंत फारसं यश आलं नाहीय.आता शिवसेना काय तयारी करत आहे? कशी निवडणुक लढवणार? याबद्दलची सर्वांनाच उत्सुकता आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोव्यात महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवण्यासाठी प्रयत्न केले पण अद्याप त्यांना यश आले नाही, गोव्यात काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जमवून घ्यायला तयार नाहीय तर दुसरीकडे काँग्रेसला शिवसेनेबद्दल सॅाफ्ट कॅार्नर दिसतोय. कारण गोव्यात काँग्रेस राष्ट्रवादी पेक्षा शिवसेनेला सोबत घेण्यात इच्छुक असल्याची माहिती मिळतेय. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रावादीनं प्रत्येकी 4-4 जागा मागितल्या होत्या त्यापैकी शिवसेनेला 3 जागा मिळत असल्याची माहिती आहे. पण हिंदुत्त्ववादी विचारसरणी असलेली शिवसेना 3 जागांसाठी गोव्यात काँग्रेससोबत जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात तीन पक्षाचं सरकार असल्यानं गोव्यातही सेम फॅार्म्युला वापरायचा होता पण कॅाग्रेसनं राष्ट्रवादीला जागा न दिल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोन प्रादेशिक पक्ष गोव्यात एकत्र येऊ शकतात.
महाराष्ट्राबाहेरची शिवसेना…
श्रीमंत डेलकर यांच्या रुपानं राज्याबाहेर खासदार मिळाला असला तरी आतापर्यंत शिवसेनेचा राज्यबाहेरचा निकाल फारसा चांगला नाहीय. युपी बिहार गोव्यासह अन्य राज्यात शिवसेना निवडणुक लढली आहे पण त्यात यश आलेलं नाहीय, काही ठिकाणी डिपॅाजिट जप्त झालं असल्याच्या घटना घडल्या आहेत तर काही ठिकाणी शिवसेनेला अपेक्षेपेक्षा जास्त मतदान झालं आहे. पण गेल्या काही काळापासून शिवसेना महाराष्ट्राच्या बाहेर आपलं जाळं परसवण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्याच्या दृष्टीनं शिवसेना एक एका राज्यात आपले पाय रोवत आहे. राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचा प्रसार व्हावा यासाठी हे प्रयत्न आहेत.
राऊतांची भूमिका काय?
गोवा आणि अन्य राज्यात शिवसेना निवडणूक लढणार का? असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना ‘नक्कीच आमचा गोव्यात आणि उत्तर प्रदेशात लढण्याची तयारी सुरु आहे. गोवा, उत्तर प्रदेश पंजाबमध्ये इतर मोठे पक्ष आहेत. ते नक्कीच चांगली तयारी करत आहेत. त्यांचा प्रचार, बॅनर, होर्डिंग दिसत असतील. तसं काही शिवसेनेचं दिसत नसेल पण शिवसेनेचा विचार आणि भूमिका लोकांपर्यंत जात असते. आमचे कार्यकर्ते निवडणुका लढवत असतात आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं आमचं कर्तव्य आहे’, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यामुळे यातून स्पष्ट झाले शिवसेना कशाप्रकारे या निवडणुका लढवणार आहे. देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानं शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष होतं पण अद्याप शिवसेनेची भूमिका स्पष्ट झालेली नाहीय. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांत निवडणुका होत आहेत. गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना काही जागा लढवणार असल्याची घोषणाच शिवसेनेने केलीय. दरम्यान, अन्य राज्यांतही महाविकास आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.
काय तयारी ? आणि कशी निवडणुक लढवणार ?
महाराष्ट्र सरकारची जबाबदारी उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर आहे. सध्या त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे सर्व निवडणुकांची जबाबदारी सध्या आदित्य ठाकरे सांभाळत असताना दिसत आहेत. गोवा आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका आदित्य ठाकरेंच्याच नेतृत्त्वाखाली लढवल्या जाणार आहेत. युपी आणि गोव्यातल्या उमेदावरांमध्ये जोश भरण्याचं काम आदित्य ठाकरे करणार आहेत. तसेच शिवसेना राज्यातल्या खासदारांना विविध मतदारसंघात जबाबदारी देणार आहे, उत्तर भाषिक नेत्यांवर जास्तीत जास्त मदार सोपवण्यात आलीय. त्यामुळे शिवसेना आपला पक्ष वाढीसाठी जास्तीत जास्त ताकद उत्तर प्रदेश आणि गोव्यात लावणार आहेत.
संबंधित बातम्या :