(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akola : अकोल्यात युवकाची चाकू भोकसून हत्या, मोठी उमरी रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळील घटना
Murder In Akola : अकोला शहरातील मोठी मोठी उमरी रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळील चिंचेच्या झाडाखाली उमेश अंबादास अटाळकर या युवकाची चाकू भोकसून हत्या करण्यात आली आहे.
अकोला : अकोल्यात 38 वर्षीय युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अकोला सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन हद्दीत मोठी उमरी रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ ही घटना घडली आहे. उमेश अंबादास अटाळकर (वय 38 रा.लहान उमरी निबंधे प्लॉट, अकोला) असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
अकोला शहरातील मोठी मोठी उमरी रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळील चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या उमेश अंबादास अटाळकर या युवकावर तीन अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला या तिघांनी उमेशच्या छातीवर आणि चेहऱ्यावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले.यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. जखमी झालेल्या उमेशला तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने रिक्षातून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी व त्याच्या मित्रांनी रुग्णालय गाठले. ही घटना आज रविवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.
जुन्या वादातून ही हत्या करण्यात आले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही.हे मारेकरी रेल्वे पुलाजवळील भागातील रहिवासी असल्याचं समजते. नेमकं या मारकऱ्यांमध्ये किती लोकांचा सहभाग आहे, हे अद्याप पर्यंत कळू शकले नाही.या सर्व मारेकऱ्यांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मारेकरी आणि मृतक उमेश हे सोबतं होते.अचानक यांच्यामध्ये वाद झाले आणि वादाचं रूपांतर हत्येपर्यंत पोहचले. हा वाद सुरू असताना येथे उपस्थित असलेल्या नितेश नामक युवकाने मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याच्या हाताला यामध्ये दुखापत झाल्याचे समजते.
संबंधित बातम्या :