Sangli Crime : सांगलीत तब्बल 50 किलो गांजा जप्त, गांजा विक्रीच्या वेळीच पोलिसांचा छापा, दोघांना अटक
Sangli Crime : या गांजाची बाजारभाव किंमत सुमारे सहा लाख रुपये आहे. पोलिसांनी हा गांजा जप्त करुन दोघांच्या मुसक्या आवळल्या.
Sangli Crime News : सांगलीत सहा लाख रुपये किंमतीचा 50 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. याप्रकरणी फारुक इस्माईल नदाफ (वय 48, रा. डवळेश्वर कॉलनी, आंबा चौक), फारुक बशिर नदाफ (वय 31, रा. मानगांव, ता. हातकणंगले) या दोघांना अटक करण्यात आलीय. महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुतगिरणी ते हनुमान मंदिर रस्त्यावर गांजा विक्रीसाठी आले असताना या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
50 किलो गांजा जप्त
फारुख नदाफ त्याच्या मोटारसायकलीवरुन सुतगिरणी ते हनुमान मंदिर रस्ता येथे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि महात्मा गांधी चौकी पोलिसांनी तेथे सापळा लावला असता फारुक इस्माईल नदाफ आणि फारुक बशिर नदाफ हे दोघे पिशव्या व बॅग घेऊन येताना दिसले. पोलिसांनी त्याना पकडून झडती घेतली असता पिशवीमध्ये 50 किलो वजनाची गांजाची 25 पाकिटे मिळून आली. या गांजाची बाजारभावे किंमत सुमारे सहा लाख रुपये होते. पोलिसांनी हा गांजा जप्त करुन दोघांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी गांजा आणि मोटारसायकल असा सहा लाख, 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सहा लाख, 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जफ्त
या कारवाईत स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, गांधी चौकीचे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, विशाल येळेकर, सुधीर गोरे, मेघराज रुपनर, अरुण औताडे, संदीप नलावडे, कुबेर खोत, हेमंत ओमासे, इम्रान मुल्ला, चेतन महाजन, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, सुहेल कार्तियानी, बाळासाहेब निळे, अमोल आवळे, चंद्रकांत गायकवाड, दिपक गायकवाड, विनायक सुतार या पोलिस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.
महत्वाच्या बातम्या